महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा,रंगणार ११ लाखाच्या पैठणीसाठी चुरस

११ लाखांच्या पैठणीसाठी महामिनिस्टरचा खेळ रंगणार आहे. महामिनिस्टर या पर्वात ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.

महाराष्ट्रातल्या अनेक वहिनींच्या घरचा पाहुणचार घेत गेली अनेक वर्ष आदेश बांदेकर(adesh bandekar)  या होम मिनिस्टर(home minister) कार्यक्रमाच्या माध्यमातून पैठणीचा शृंगार महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवत आहेत. होम मिनिस्टर हा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा ती फक्त १३ भागांची मालिका करायची होती. पण सुरुवातीच्याच १३ भागांमध्ये या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती मिळाली आणि हा कार्यक्रम सुपर हिट ठरला. १३ भागांपासून सुरु झालेल्या मालिकेचा हा प्रवास आजतागायत अविरत सुरु आहे.

महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीला आलं आणि प्रचंड गाजलं सुद्धा. महामिनिस्टर या पर्वात ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या महाअंतिम सोहळ्यामध्ये १० वाहिनीमध्ये म्हणजेच स्पर्धकांमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी महामिनिस्टरचा खेळ रंगणार आहे.

महामिनिस्टर हे पर्व सुरु झाल्यापासूनच ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. ही ११ लाखांची पैठणी अत्यंत आकर्षक आहे. या पैठणीला सोन्याची जर आणि सर्वत्र हिरे जड्वले गेले आहेत आणि हीच आकर्षक पैठणी कशी आहे हे पाहण्याचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. कोणतं शहर हि ११ लाखांची पैठणी जिंकण्याच्या मन मिळवणार हे आणि महाराष्ट्राच्या महापैठणीचा मान कोणतं शहर मिळवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महामिनिस्टरचा महाअंतिम(maha minister grand finale) सोहळा पार पडल्यांनंतर सोमवारी २७ जून पासून होम मिनिस्टरचं ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात बहिणी त्यांच्या आवडत्या ग्रुप सोबत म्हणजेच महिला मंडळांसोबत सहभाग घेऊ शकतात.

या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातल्या वहिनींचा सन्मान केला आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर(adesh bandekar) यांना मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. महाराष्ट्रातल्या घराघरात त्यांचं हक्कचं स्थान सुद्धा आहे.

महामिनिस्टर या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये ११ लाखाची आकर्षक पैठणी कोण मिळविणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्येही आहे.