Sarkaru Vaari Paata : महेश बाबूच्या मुलीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

महेश बाबू लवकरच सरकारू वारी पाटा या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा महेश बाबूसाठी खास असणार आहे. कारण या सिनेमातून महेश बाबूची मुलगी सितारा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सितारा तिच्या आयुष्यातील पहिलाच सिनेमा आपल्या वडिलांसोबत करणार आहे.

mahesh babu daughter sitara ghattamaneni debuted with sarkaru vaari paata Movie
Sarkaru Vaari Paata : महेश बाबूच्या मुलीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

अभिनेता महेश बाबू हे साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. महेश बाबूचे चाहते त्यांच्या सिनेमांची आतूरतेने वाट पाहत असतात. महेश बाबू लवकरच सरकारू वारी पाटा या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा महेश बाबूसाठी खास असणार आहे. कारण या सिनेमातून महेश बाबूची मुलगी सितारा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सितारा तिच्या आयुष्यातील पहिलाच सिनेमा आपल्या वडिलांसोबत करणार आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारू वारी पाटा सिनेमातील सिताराचे पेनी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पेनी गाण्यात सितारा जबरदस्त डान्स करताना दिसली होती. सिताराच्या एँटिट्यूडवर सगळेच फिदा झाले होते. तर महेश बाबू देखील सिनेमात शानदार अंदाजात दिसलाय महेश बाबूचा सिनेमातील हा खास अंदाज पाहून त्याचे चाहते भलतेच खुश झालेत.

महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर देखील मुलीच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाविषयी फार खुश आहे. पेनी गाण्याला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नम्रता फार खुश आहे.

सरकारू वारी पाटा हा सिनेमा १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात महेश बाबूसोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. परशुराम यांनी सिनेमाची डिरेक्शन केले आहे. महेश बाबूच्या मुलीचा पहिलाच सिनेमात आता प्रेक्षकांच्या कितपत आवडतो हे आता सिनेमा रिलीज झाल्यावरच कळणार आहे.


हेही वाचा – Shabaash Mithu Teaser :अनुष्कानंतर तापसीही क्रिकेटरच्या भूमिकेत, शाब्बास मिठ्ठूचा टीझर आऊट