घरताज्या घडामोडीहोळीच्या रंगात रंगणार यश-नेहाचं प्रेम

होळीच्या रंगात रंगणार यश-नेहाचं प्रेम

Subscribe

यश आणि नेहाने नुकतीच एकमेकांना प्रेमाची कबूली दिली आहे आणि येत्या काळात दोघांमधील प्रेम आणखी खुलणार आहे. या होळीत प्रेक्षकांना नेहा यशच्या प्रेमाचे नवे रंग पाहायला मिळणार आहेत.

अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच माझी तुझी रेशमीगाठ. नेहा यश आणि चिमुकल्या परीने अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली असून लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यश आणि नेहाने नुकतीच एकमेकांना प्रेमाची कबूली दिली आहे आणि येत्या काळात दोघांमधील प्रेम आणखी खुलणार आहे. या होळीत प्रेक्षकांना नेहा यशच्या प्रेमाचे नवे रंग पाहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

मालिकेत नुकताच होळी स्पेशल एपिसोड शूट करण्यात आला. नेहा यशचे होळी खेळतानाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात नेहा आणि यश एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.

- Advertisement -

या धुळवडीत यश नेहाला तिचे आयुष्य रंगांनी भरुन टाकणार असे कबुल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीतील रंग आणखीच खुलून येणार आहेत. परीचा फ्रेंड आणि नेहा आता आयुष्यभरासाठी एकत्र आल्याने परी देखील फार खुश आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदेने अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर छोटी मायरा देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. परी म्हणजेच मायरा वायकूळची देखील सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.


हेही वाचा – Photo : ‘जलसा’च्या प्रमोशन दरम्यान विद्या बालन आणि शेफाली शाहचा गॉर्जिअस लूक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -