घरमनोरंजनMajor VS Samrat Prithviraj : 'मेजर' चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'वर पडला भारी; कमावले...

Major VS Samrat Prithviraj : ‘मेजर’ चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’वर पडला भारी; कमावले इतके कोटी

Subscribe

या चित्रपटात आदिवी शेष यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे

या शुक्रवारी थिएटरमध्ये एक नाही तर तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे चित्रपट गृहात जाऊन काय पहावे, याबाबत प्रेक्षक संभ्रमावस्थेत सापडले आहे. 3 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये ‘विक्रम’ आणि ‘मेजर’ यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. या तिन्ही चित्रपटांचे पहिल्या दिवशाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहे. पहिल्या दिवशी मेजरची कमाई कशी होती ते जाणून घेऊया. (Major Box Office collection Day 1)

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, कमल हसनच्या विक्रम या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराजने ओपनिंग डेला 10.70 कोटींची कमाई केली आहे. सम्राट पृथ्वीराजच्या तुलनेत आदिवी शेषच्या मेजरने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Major Box Office First day)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sesh Adivi (@adivisesh)

- Advertisement -


आदिवी शेषने (Adivi Sesh film)  त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ओपनिंग डे कलेक्शन शेअर करत आनंद व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे तरण आदर्शनेही या चित्रपटाने अमेरिकेत 2 कोटींची कमाई करून नवी सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. आदिवी शेष यांच्या चित्रपटाने अमेरिकेत इतकी चांगली कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच दिवशी जर चित्रपटाने इतकी कमाई तर आगामी काळात हा चित्रपट आणखी कमाई करु शकतो.

या चित्रपटात आदिवी शेष यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनी केली आहे. चित्रपटात आदिवी शेषसह सई मांजरेकर आणि शोभिता धुलिपाला यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सई मांजरेकर ही महेश मांजरेकर यांची मुलगी आहे, ज्यांनी सलमान खानच्या दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

- Advertisement -

आदिवी शेषची पहिल्या दिवसाची कमाई समोर आल्यानंतर हा चित्रपट सम्राट पृथ्वीराजला टक्कर देणार आहे, असे म्हणता येईल. मात्र आगामी आठवड्यापर्यंत चित्रपट किती कमाई करू शकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


जॉनी डेपला ११६ कोटी रुपये देण्यास एम्बर हर्ड सक्षम नाही, वकिलाचा खुलासा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -