घरमनोरंजन'मकडी' चित्रपटातील चुन्नीची अधुरी एक कहाणी

‘मकडी’ चित्रपटातील चुन्नीची अधुरी एक कहाणी

Subscribe

इन्स्टाग्रामवरून विभक्त होण्याची माहिती दिली.

टेलिव्हिजनच्या दुनियेतून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवणारी श्वेता बसू प्रसाद आणि चित्रपट निर्माता रोहित मित्तल यांचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विवाह झाला होता. मात्र अलीकडेच या दोन्ही कलाकारांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती ‘मकडी’ चित्रपटातील अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. श्वेता असं म्हणाली की, ‘मी आणि रोहित मित्तल याने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ तसंच तिने रोहितचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

‘मकडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्वेता बसू प्रसाद हिची लग्नाबद्दलची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या ही पोस्ट पाहून खूप प्रतिक्रिया देत आहेत. पुढे तिने पोस्टमध्ये असं लिहिलं, ‘अनेक महिन्यानंतर आम्ही एकमेकांच्या भल्यासाठी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत. प्रत्येक पुस्तक वाचता येत नाही, याचा अर्थ असा नाही की पुस्तक वाईट आहे किंवा कोणीही वाचून शकतं नाही. काही गोष्टी अपूर्ण ठेवणे हेच चांगले.’

View this post on Instagram

@rohitmittal2607

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on

- Advertisement -

तसंच तिने रोहित आभार मानतं लिहिलं की, ‘कायम प्रेरित केल्याबद्दल आणि एवढे अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल रोहित तुझे धन्यवाद. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…तुझीच चिअरलीडर.’

श्वेता हिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तिला ‘मकडी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळाला आहे. ‘मकडी’ चित्रपटानंतर श्वेता ही ‘कहानी घर घर की’, ‘करिश्मा का करिश्मा’, ‘इकबाल’, ‘वाह लाएफ हो तो ऐसी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘चंद्र नंदिनी’ अशा चित्रपट आणि मालिकांमधून दिसली आहे.


हेही वाचा ‘अॅसिड बिकता नही, तो फिकता नही’; ‘छपाक’ ट्रेलर रिलीज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -