मनोज वाजपेयी 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्यांच्या आगामी ‘सिरह एक बंद ही काफी है’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्याने वकिलाची भूमिका साकारली होती. मनोज वाजपेयी नेहमीच त्यांच्या विविध चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांनी जवळपास 30 वर्षांपूर्वी ‘द्रोह काल’, ‘बँडिट क्वीन’, ‘सत्या’ या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या वयाच्या 54 वर्षाचे असणारे मनोज आजही तरुणांप्रमाणे निरोगी आणि फीट आहेत. अलीकडेच मनोज वाजपेयीनी त्यांच्या एका मुलाखतीचा आपल्या निरोगी शरीराचे रहस्य सर्वांना सांगितले. ज्यामध्ये त्यांनी 14 वर्षांपासून रात्रीचे जेवण का केले नाही हे देखील सांगितले.

मनोज वाजपेयींनी 14 वर्षांपासून रात्रीचे जेवण का केले नाही?

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

मनोज वाजपेयींनी 13-14 वर्षांपासून रात्रीचे जेवण केले नाही. त्यांना, जेव्हा खूप भूक लागते तेव्हा ते हेल्दी आहार किंवा फळं खातात. 14 वर्षांपासून रात्रीचे जेवण का केले नाही यामागचे कारण सांगताना मनोज वाजपेयींनी सांगितले की, एका डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, रात्रीचे जेवण लवकर करा, नाहीतर अन्न तुमच्या पोटात तसेच पडून राहील. ज्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी सुरुवातीचा 1 आठवडा खूप कठीण होता आणि रात्रीच्या जेवणाच्या सवयीमुळे रात्री भयानक भूक लागलायची पण त्यावेळी ते दोन पौष्टिक बिस्किटं आणि भरपूर पाणी प्यायचे. यामुळे त्यांना भूक कमी होण्यास मदत झाली.

Manoj Bajpayee says he is against web series' use of sex and violence to get eyeballs - Hindustan Times

अशा प्रकारच्या डाएटमुळे मनोज वाजपेयी आजही तितकेच तरुण आणि फिट दिसत आहेत. त्यांनी सांगितले की या प्रकारच्या डाएटमुळे साखर, कोलेस्ट्रॉल , हृदयविकार असे आजार कधीच होत नाहीत.


हेही वाचा :

‘द केरला स्टोरी’ सिनेमातील अभिनेत्रीचे धक्कादायक विधान; काय आहे प्रकरण