घरमनोरंजन'फिल्मॅजिक'च्या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रेटी एकाच मंचावर

‘फिल्मॅजिक’च्या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रेटी एकाच मंचावर

Subscribe

नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणुन माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो, असे संजय जाधव यांनी यावेळी सांगितले.

दुनियादारी, येरे येरे पैसा,तु ही रे,फक्त लढ म्हणा,सातच्या आत घरात,लकी, प्यार वाली लव्ह स्टोरी यासारख्या अनेक चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकणारा दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणजेच संजय जाधव. संजय जाधव आता एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसणार आहे. संजय जाधव ‘फिल्मॅजिक’ ह्या फिल्म स्कुलच्या माध्यातून एक नवी इनिंग सुरु करत आहे. ‘फिल्मॅजिक’ ह्या फिल्म स्कुलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. उद्घाटनाला सिनेसृष्टीतल्या मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनी उपस्थिती लावली. महागुरु अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते फिल्मॅजिकचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी संजय जाधव ह्यांना अनेक शुभेच्छा दिल्या. ‘संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय, त्याचं नेतृत्व फिल्मॅजिक स्कुलच्या विद्यर्थ्यांचं करीयर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल’, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित उमेश कामत, सोनाली खरे, सिध्दार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय नार्वेकर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याचबरोबर नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे हे कलाकारही उपस्थित होते.

सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबावायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो. पण नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणुन माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो, असे संजय जाधव यांनी यावेळी सांगितले. फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे वैशिष्ठ्य आहे की, इथे प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नाहीत,असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

संजय जाधवसोबत माझं नातं आभाळमाया मालिकेपासूनचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी त्याच्याकडून शिकतोच आहे. प्रत्येक मालिके, फिल्मगणिक मी खूप शिकत गेलो. जसं मला खूप शिकता आलं, ती संधी फिल्मॅजिकमूळे इथल्या विद्यार्थ्यांना मिळेल, असे अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला. अंकुश चौधरी आणि संजय जाधव यांचे गेली अनेक वर्षे चांगले संबंध आहेत. संजय जाधव यांच्या या नव्या प्रवासाला अंकुश चौधरीने खूप खूप शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर अभिनेता स्वप्निल जोशी आणि संजय जाधव यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. फिल्मॅजिकच्या उद्घाटनावेळी स्वप्निलने संजय जाधवच्या नव्या प्रोजेक्टसाठी अनेक शुभेच्छा दिल्या. ‘संजय जितका चांगला, निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता आहे तितकाच चांगला शिक्षक आहे. मी त्याच्यासोबत खूप जास्त काम केलंय. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो, की, त्याची शिकवण्याची कला फार कमाल आहे. तो तुमच्या मनात शिरून तुमच्याकडून परफॉर्मन्स काढून घेतो. त्यामूळे संजयने ही फिल्म स्कुल सुरू करणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्या फिल्म स्कुलला माझ्या शुभेच्छा, असे स्वप्निल म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – बिग-बींची बॉलिवूडमध्ये Half-Century; शेअर केला थ्रो बॅक फोटो, म्हणाले…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -