Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन '...म्हणून प्रयोग असे म्हणतात'; अभिनेते प्रशांत दामलेंनी दिले चाहत्याला उत्तर

‘…म्हणून प्रयोग असे म्हणतात’; अभिनेते प्रशांत दामलेंनी दिले चाहत्याला उत्तर

Subscribe

चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेते प्रशांत दामले यांचं भन्नाट उत्तर,प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोद बुद्धीने अनेकांची मनं जिंकली आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या गाण्याच्या ओळी आठवल्यावर अभिनेते प्रशांत दामले हे डोळ्यांसमोर येतात. प्रशांत दामले यांनी आजपर्यंत आपल्या प्रत्येक गाण्याने, अभिनयाने आणि खवय्येगिरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याने त्यांच्या नाटकावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर नाटकाच्या प्रयोगासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका चाहत्याने नाटकाचे ‘प्रयोग’ का म्हणतात? असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी “कारण प्रत्येक नाटक हा एक Experiment (प्रयोग).., कधीही काहीही चुकू शकत किंवा कधीही काहीही नवीन काहीतरी मिळू शकत”, असे उत्तर प्रशांत दामले यांनी दिले आहे.

- Advertisement -

प्रशांत दामलेंच्या या उत्तरानंतर चाहत्यांनी चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहेत. दरम्यान, प्रशांत दामले हे फेसबुकवर नेहमी सक्रीय असतात. अनेकदा त्यांच्या विविध नाटकांच्या प्रयोगांचे फोटो शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी नाटकाच्या प्रयोगासंदर्भात पोस्ट शेअर केली होती.

दरम्यान, प्रशांत दामले हे सध्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये सोलापूर मध्ये व्यस्त आहेत. या नाटकात प्रशांत दामले यांच्यासोबत अभिनेत्या कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. या शिवाय ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटायला येतात


- Advertisement -

हेही वाचा – Malaika Arjun Wedding : मलायका अरोरा-अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -