घरमनोरंजनतुझी अश्लील अदाकारी बघायला कोणालाही आवडणार नाही! लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी घेतली गौतमीची शाळा

तुझी अश्लील अदाकारी बघायला कोणालाही आवडणार नाही! लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी घेतली गौतमीची शाळा

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यात आणि सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या लावणीची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तिच्या लावणीचे अनेक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हातील बेडगमधील पार पडलेल्या लावणी कार्यक्रमामध्ये तर गौतमीची लावणी पाहण्यासाठी आलेल्यांनी तर हद्दच पार केली होती. इतकचं नव्हे तर हा कार्यक्रम झाला त्या परिसरात एक मृतदेह देखील आढळला होता. याचं कारणांमुळे गौतमी आता पुन्हा चर्चेत आली आहे.

तसेच याआधी देखील एका सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौतमीने नाचता-नाचता अंगावर पाणी ओतून घेतले, तसेच यावेळी लावणीमध्ये तिने केलेल्या हावभावांमुळे आणि अश्लील नृत्यामुळे देखील ती वादाच्या कचाट्यात सापडली होती. गौतमीच्या या कृत्यावर अनेकांनी टिका केली होती. यावेळी सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांनी देखील गौतमीच्या अश्लील लावणीवर टिका केली होती. त्यावेळी गौतमीने सर्वांची माफी मागितली होती.

- Advertisement -

परंतु आता सांगलीमध्ये झालेल्या प्रकारामुळे लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे यांनी गौतमीवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर करत मेघा घाडगे यांनी टिका केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की,
खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं. का या शाहिरानीं कवन लिहिली??? पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं . विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले आत्ता माझे डोळे उघडले. मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको ..? लक्षात नाही तू घातले होतेस का?

- Advertisement -

तसेच मेघा घाडगे यांनी पुढे लिहिलंय की, ‘काल तर प्रेक्षकांना मधनं गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून . पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो पिचर बाकी हैं…!! आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीझ मला हे सगळं शिकावं अल्बम मध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र ) ते ही आयटम साँग म्हणून. पण स्टेज वर नाही केल कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का??कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय, घुंगरू, शालू.. विकणे आहे .. प्लीझ मेसेज करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … लव्ह यू गौतमी’, अशी पोस्ट मेघा घाडगे यांनी लिहिली आहे. शिवाय त्यानंतर फेसबुक लाईव्ह वरुन गौतमी आणि तिची बाजू घेणाऱ्यांना धारेवर धरलं.

 


हेही वाचा :

आलियाने दिला गोंडस मुलीला जन्म; कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -