घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

Subscribe

बॉलिवूडचे दिग्गज मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत असतानाचा हा फोटो आहे. या फोटोनंतर अभिनेत्याच्या प्रकृतीबाबतही विविध अफवा उडत आहेत.

मिथुन यांचा हॉस्पीटलमधील फोटो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय. मिथुन यांना अशा अवस्थेत पाहून चाहत खूप दुखावले आहेत. मात्र अभिनेत्याचा व्हायरल झालेल्या फोटोमागचे सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊ…

- Advertisement -

मिथुन यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती यांनी नुकतीच अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोन आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हायरल फोटो रुग्णालयातीलचं असून यात ते बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेले दिसत आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना बंगळुरु येथील रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. पण ते आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

- Advertisement -

मिथुन चक्रवर्तीच्या तब्येतीबाबत ताज्या अपडेट्स आता समोर आल्याने लाखो चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सर्वच जण आता अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपण हजरा यांनीही मिथुन चक्रवर्ती यांचे फोटो शेअर करत ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती नुकतेच कलर्सवरील हुनगबाज या शोमध्ये दिसले. मिथुन चक्रवर्ती हे या शोचे जज होते, त्यांनी शोच्या संपूर्ण प्रवासात आपल्या खास शैलीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या वर्षांच्या ऐतिहासिक चित्रपट द काश्मीर फाइल्स मध्येही मिथुन दिसले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातू कौतुक झाले.


Heat Stroke : राज्यात दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 जणांचा मृत्यू, केंद्राने जारी केल्या महत्त्वाच्या सुचना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -