घरमनोरंजनफरहान अख्तरचा 'तुफान' ओटीटीवर दाखल, 16 जुलैला होणार रिलीज

फरहान अख्तरचा ‘तुफान’ ओटीटीवर दाखल, 16 जुलैला होणार रिलीज

Subscribe

भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या तुफान या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून 16 जुलै प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफानमध्ये फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या आधी त्याने ‘भाग मिल्खा भाग’ या दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. फरहान अख्तरची या चित्रपटातील भूमिकाही लोकप्रिय आहे. फरहान अख्तर याने या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘तुफान’ कींवा ‘भाग मिल्खा भाग’ या दोन्ही चित्रपटांच्या भूमिकेतून फरहान अख्तरची मेहनत, जिद्द आणि चिकाटी दिसून येते. अभिनेता फरहान अख्तर इतक्या सरावानंतर आणि मेहनतीनंतर बॉक्सर झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज तुफान या फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला तुफान हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

- Advertisement -

भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक सिनेमा 16 जुलै पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुफान मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

- Advertisement -

भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

तुफान मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.’तुफान’सह एका अद्वितीय आणि प्रेरणादायी प्रवासासाठी सज्ज व्हा 16 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर.


 

हे हि वाचा – मिथून चक्रवर्तीला दाऊदकडून मिळाल्या होत्या जिवे मारण्याच्या धमक्या

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -