घरताज्या घडामोडीदूरदर्शनच्या 'गजरा' कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर काळाच्या पडद्याआड

दूरदर्शनच्या ‘गजरा’ कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर काळाच्या पडद्याआड

Subscribe

दूरदर्शनवर अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार घडताना त्यांनी पाहिले होते.

मुंबई दूरर्शनच्या स्थापनेपासून अविरत कार्यरत असणारे निर्माते विनायक चासकर यांचे बुधवारी मध्यरात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. दूरदर्शनला सर्वांत्तम कलाकृती देणाऱ्या विनायक चासकर यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी ठाण्यात त्यांच्या राहत्या घरी अखरेचा श्वास घेतला. दूरदर्शनवर अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार घडताना त्यांनी पाहिले होते. दूरदर्शनवरील त्याचा सर्वात गाजलेला कार्यक्रम म्हणजे ‘गजरा’. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर यासारखे अनेक कलाकार गजरा या कार्यक्रमातून पुढे आले आणि लोकप्रिय झाले.

विनायक चासकर यांचा ‘स्मृतीचित्रे’ हा कार्यक्रमही त्यावेळी अत्यंत गाजला होता. या कार्यक्रमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. याच काळात ‘आश्रित’ हे नाटकही खूप गाजले होते. विनायक चासकरांच्या आश्रित या नाटकालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लक्षीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी, विनय आपटे, सुरेश खरे, किशोर प्रधान, सुमती गुप्ते हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी विनायक चासकर यांचा मोलाचा वाटा आहे.

- Advertisement -

विनायक चासकर यांचा नाटक फार जिव्हाळ्याचा विषय होता. १९७२ साली दूरदर्शनची स्थापना झाल्यापासून विनायक चासकर दूरदर्शनमध्ये कार्यरत होते. दूरदर्शनमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक दर्जेदार,सदाबाहर मालिकांची त्याचबरोबर अनेक दमदार कार्यक्रमांची निर्मिती केली. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयातून डिग्री मिळवल्यानंतर विनायक मुंबई दूरदर्शनमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करत होते. दूरदर्शनमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले होते. त्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा परसली आहे.


हेही वाचा – अभिनेते ते नेते…एक भ्रमनिरास प्रवास
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -