घरमनोरंजनराष्ट्रीय पुरस्कार विजते बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजते बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

Subscribe

नॅशनल अवॉर्ड विनर बंगाली फिल्ममेकर बुद्धदेव दासगुप्ता यांचे कोलकातामध्ये निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसापासून त्यांना वृद्धापकाळातील आजारांनी घेरले होते. त्यांच्या  5 चित्रपटांना बेस्ट फीचर फिल्म अंतर्गत नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. तसेच 2 चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बुद्धदेव दासगुप्ता यांनी आपल्या करियरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली होती. नंतर त्यांनी फिल्ममेकिंग क्षेत्रात पुढे जायचे ठरवले.  बुद्धदेव दासगुप्ता यांनी 1968 साली 10 मिंटाच्या एका डॉक्यूमेंट्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांचा पहिला वहिला सिनेमा ‘दूरात्वा’1978 साली रिलीज झाला होता.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनामुळे दुख:व्यक्त करत ट्विट केले आहे की,”प्रख्यात चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुख: झाले आहे . आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंब, सहकारी आणि प्रशंसकांना सहानुभूती.”

- Advertisement -

बुद्धदेव दासगुप्ता हे एक कवि सुद्धा होते त्यांना कविता लिहण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी लिहलेल्या कविता फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत ज्यात कोफिन किम्बा सूटकेस, हिमजोग, श्रेष्ठ कबिता, भोमबोलर आश्चर्य कहानी यासुद्धा समाविष्ट आहेत.


हे हि वाचा – ‘महाभारत’ सिनेमात रिया झळकणार ‘द्रौपदीच्या’ भूमिकेत ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -