‘तिरसाट’मधून राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘तिरसाट’ चित्रपटाचा नुकताच नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी आपल्याला पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातलं ‘उधाण आलंया’ असं एक गाणं आणि चित्रपटाचे टीझर लॉंच करण्यात आले होते. या गाण्याला चित्रपटांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

‘तिरसाट’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी केले आहे. याशिवाय चित्रपटात यतीन कार्येकर ,ओंकार यादव, सुजीत चौरे, विवेक यादव, आनंद साने यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. आदर्श शिंदे ,  मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. निर्माता दिनेश यांनी चित्रपटाचे लेखन केलं आहे.

प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीझरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ‘तिरसाट’ हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे.

राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत करतोय चित्रपटसृष्टीत पदार्पण

या चित्रपटातील मुख्य नायक नीरज सूर्यकांत हा राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडी पुरस्कार मिळालेले सूर्यकांत पवार यांचा मुलगा , राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत याने याआधी नीरजने ‘वऱ्हाड आलंय लंडनहून’, ‘चांडाळचौकडी’ वेब सीरिज करत तो तिरसाट चित्रपटातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.


हेही वाचा :‘गोदावरी’ चित्रपटासाठी जितेंद्र जोशीने पटकावला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार