घरमनोरंजनMX Player वरील 'सबका साई' वेब सिरिजला नेटकऱ्यांचा विरोध

MX Player वरील ‘सबका साई’ वेब सिरिजला नेटकऱ्यांचा विरोध

Subscribe

लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत अनेकदा मालिकेच्या माध्यमातून देखील त्यांची फसवणूक करण्यात येते.

गेल्या अनेक दशकापासून छोट्या पडद्यावर तसेच अनेकदा बिग स्क्रिनवर पौराणिक सिनेमा रिलीज केल्यानंतर भाविकांनी या सिनेमाला उदंड प्रतिसाद दिला. याचदरम्यान शिर्डीचे साईबाबा यांच्यावर आधारित अनेक मालिका देखील टेलिकास्ट करण्यात आल्या आहेत. साईबाबांनी केलेल्या अद्भूत चमत्कारांचे वर्णन अगदी सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले होते.  श्रद्धेपोटी अनेक लोकांनी या टिव्हीवर दाखवणाऱ्या कथेवर विश्वास ठेवतं अनेक भाविक साईनाथांच्या चरणी नतमस्तक झाले. पण लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत अनेकदा मालिकेच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करण्यात येत असल्यामुळे आता अनेक भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे  mx player या प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सबका साई’ या मालिकेवर लोकांच्या आस्था आणि भावनेशी फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे. (Netizens oppose ‘Sabka Sai’ web series on MX Player)

 

- Advertisement -

‘आश्रम’ या वेब सिरिजला लोकांनी बॅन करण्याची मागणी केल्यानंतर आता mx player वर ‘सबका साई’ ही नवी वेब सिरीज 26 ऑगस्ट रोजी टेलिकास्ट करण्यात येणार आहे. मात्र ट्विटरवर नेटकऱ्यांनी आत्तापासूनच हा वेब शो वर अनेक सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जग कोरोना महामारीच्या काळात नकारात्मकतेचा सामना करत आहे. तर दुसरीकडे धर्माच्या नावाने बाब ,साधू सारखे वस्त्र परिधान करत पाखंण्डी लोकं भाविकांच्या तसेच लोकांच्या भावनांशी खेळत आहे. या परिस्थितीत ‘सबका साई’ ही वेब सिरीज रिलीज करणे उचित नाही. असे नेटकऱ्यांनी त्यांचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. लोकांच्या मनात साई बाबांसाठी अपार श्रद्धा आहे. पण याचा गैरफायदा घेत बाबांच्या नावाने लोकांना वेठीस धरले जात आहे. यामुळे अनेकांनी हा वेब शो बंद करण्याची मागणी केली आहे.


हे हि वाचा – RakshaBandhan:बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिण भावंडाची जोडी तुम्हाला माहिती आहे का

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -