घरमनोरंजनपाकिस्तानी मुलीसारखा डान्स करणं माधुरी दीक्षितला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पाकिस्तानी मुलीसारखा डान्स करणं माधुरी दीक्षितला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Subscribe

गाणकोकिळा लता मंगेशकर यांच “मेरा दिल ये पुकारे आजा..” हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्स या गाण्यावर डान्स करत आहेत. खरंतर, पाकिस्तामधील आयशा नावाच्या मुलीने जेव्हा या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला तेव्हापासून तो प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडीओमधील आयशाची डान्स करण्याची पद्धत आणि स्टेप्स सर्वांना प्रचंड आवडली. आता अनेकजण तिच्या सारखा डान्स करुन रिल्स बनवू लागले आहेत. आता या यादीमध्ये बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे नाव देखील जोडलं जात आहे.

माधुरीने केला आयशा सारखा डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने देखील सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले “मेरा दिल ये पुकारे आजा..” या गाण्यावर डान्स करत एक व्हिडीओ शेअर केला. या गाण्यात माधुरीने हुबेहुब आयशाच्या सर्व स्टेप्स कॉपी केल्या आहेत. अनेकांना माधुरीचा हा डान्स आवडला मात्र, काहीजण तिला या डान्समुळे ट्रोल करु लागले आहेत.

माधुरीला केलं ट्रोल
माधुरीच्या या डान्सवर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातील एका युजरने लिहिलंय की, “आयशा एवढं चांगलं नाही जमलं मॅम” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “प्लीज मॅम हा ट्रेंड नको” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, “तुम्हाला या गाण्यावर डान्सच करायचा होता तर वेगळ्या स्टेप्स करायला हव्या होत्या.”

- Advertisement -

 

 

 


हेही वाचा :

पोस्ट ऑफीस उघडं आहे… लवकरच सुरु होणार ही नवी मालिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -