घरमनोरंजननव्या मालिकेत शशांक केतकर-मृणाल दुसाणीसची जोडी!

नव्या मालिकेत शशांक केतकर-मृणाल दुसाणीसची जोडी!

Subscribe

९ अॉक्टोबरपासून 'हे मन बावरे' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर, मृणाल दुसाणीस ही प्रेश जोडी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

कलर्स मराठीवर ‘हे मन बावरे’ ही नवी मालिका ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला. या मालिकेतून शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत आणि मृणाल दुसाणीस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसाणीसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे.

‘हे’ कलाकर असणार

‘हे मन बावरे’ मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसाणीस ही फ्रेश जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. मालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राउत देखील असणार आहे. शर्मिष्ठा शशांकच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

- Advertisement -

मालिकेच्या कथेबदद्ल गुप्तता

मालिकेची कथा काय असेल? मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार असतील? हे सगळं अद्याप गुलदस्त्यातच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -