घरताज्या घडामोडीकंगनाच्या Lock Uppमध्ये निशा रावलने केला पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा खुलासा

कंगनाच्या Lock Uppमध्ये निशा रावलने केला पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा खुलासा

Subscribe

मी एकदा करणला विचारले तुझे एक्स्ट्रा मँरिटिअल अफेअर सुरू आहे का? माझ्या प्रश्नावर त्याने हो असे उत्तर दिले.माझा मुलगा काविशचा जन्म झाला तेव्हा पासून त्याचे अफेअर सुरू होते. करण मला एकदा म्हणाला होता मी एका व्यक्तीवर प्रेम करतो पण माझे तुझ्यावरही प्रेम आहे.

एकता कपूरचा नवा रिअँलिटी शो लॉक अप सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये अनेक तगडे स्पर्धक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री निशा रावल देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. निशाने तिच्या ग्रँड ओपनिंगनंतर प्रेक्षकांच्या आपल्याकडे खेचण्यासाठी सुरूवात केली आहे. निशा रावलने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्कादायक घटना सांगून तिच्या चाहत्यांना चक्रावून सोडले आहे.

शोमध्ये निशा अभिनेता करणवीर बोहरासोबत बोलत असताना तिने तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला. निशा म्हणाली, तिचा मुलगा काविशला फार कमी वयात पालकांच्या विभक्त होण्याचा सामना करावा लागला. माझा पती करण मेहराचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा निशाने इथे केला. निशा हे सांगताना फार इमोशनल झाली होती.

- Advertisement -

निशा पुढे म्हणाली, मी एकदा करणला विचारले तुझे एक्स्ट्रा मँरिटिअल अफेअर सुरू आहे का? माझ्या प्रश्नावर त्याने हो असे उत्तर दिले. मागच्या सात आठ महिन्यांपासून करणचे अफेअर सुरू होते,असा दावा तिने केला. ती म्हणाली, माझा मुलगा काविशचा जन्म झाला तेव्हा पासून त्याचे अफेअर सुरू होते. करण मला एकदा म्हणाला होता मी एका व्यक्तीवर प्रेम करतो पण माझे तुझ्यावरही प्रेम आहे.

- Advertisement -

करणने मला त्याच्या अफेअरविषयी सांगितल्यानंतर तो त्या व्यक्तीला जाऊन भेटला आणि मुंबईला परत आला. माझी आई तेव्हा माझ्यासोबत होती. तिच्यापासून मी या सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या. मला माझ्या मुलासाठी सगळे काही नॉर्मल सुरू आहे असे दाखवावे लागत होते.

निशा रावलने पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचे आरोप देखील केला होता. निशाने करण विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. करणच्या घरच्यांनी निशाला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. परंतु करणने हे सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. निशाच्या आरोपांमुळे करणला जेलमध्ये जावे लागले होते. जामिनावर करणची सुटका करण्यात आली.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -