इंदूरमध्ये ‘पठाण’ला विरोध; फर्स्ट डे फर्स्ट शो करावा लागला रद्द

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ आज संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला होणार विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील सपना संगीत चित्रपटगृहासमोर एका हिंदू संघटनेकडून आज सकाळच्या पहिल्या शोला विरोध करण्यात आला.

इंदूरमध्ये ‘पठाण’ला विरोध

PunjabKesariमिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील सपना संगीत चित्रपटगृहासमोर एका हिंदू संघटनेकडून आज सकाळच्या पहिल्या शोला विरोध करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्ते चित्रपटगृहासमोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Online.Indori (@online.indori)

मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही सपना संगीत चित्रपटगृहातील आज पहिल्या दिवशीचा पहिला शो रद्द करण्यात आला. यावेळी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणा करत चित्रपटगृह पेटवून देण्याची धमकी दिली.

‘या’ राज्यांमध्ये देखील झाला विरोध
इंदूरआधी सुरत, गुवाहाटी आणि आग्र्यामध्ये देखील चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध करण्यात आला. परंतु तरीही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

‘बेशरम रंग’गाण्याला झाला विरोध
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

 


हेही वाचा :

ऑनलाइन लीक झाला ‘पठाण’; निर्मात्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं केलं आवाहन