घरमनोरंजनऑनलाइन लीक झाला ‘पठाण’; निर्मात्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं केलं आवाहन

ऑनलाइन लीक झाला ‘पठाण’; निर्मात्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं केलं आवाहन

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज (25 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत होता. भारतातील अनेक राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला जात असला तरी प्रेक्षक चित्रपट पाहण्यास खूप उत्सुक आहेत. अशातच यशराज फ्लिम्स आणि शाहरुखसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ‘पठाण’चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मंगळवारी रात्री ऑनलाइन लीक झाला आहे.

ऑनलाइन लीक झाला ‘पठाण’
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पठाण’ प्रदर्शनाच्या एक दिवस आधी दोन ऑनलाइन वेबसाइटवर लीक झाला आहे. असं म्हटलं जातंय की, “Filmyzilla आणि Filmy4wap या वेबसाइटवर लीक झाला आहे. याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्वीटर वरुन आवाहन केलंय की, सर्वजण अॅक्शन पाहण्यासाठी तयार आहात? सर्वांना नम्र विनंती आहे की कोणता व्हिडीओ रेकॉर्ड करणे, ते ऑनलाइन शेअर करणे टाळा. ‘पठाण’चा अनुभव फक्त थिएटरमध्येच घ्या.” याशिवाय, निर्मात्यांनी एक ईमेल आयडी देखील दिला आहे ज्यावर पायरसीची तक्रार केली जाऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

- Advertisement -

हेही वाचा :

‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’नंतर आता ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्कर अवॉर्डमध्ये एन्ट्री

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -