Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'या' व्यक्तीने साधला सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशी संवाद

‘या’ व्यक्तीने साधला सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशी संवाद

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी करत स्टीव हफ अधिकच प्रकाश झोतात आला होता. अशातचं सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतरही चाहत्यांनी सिद्धार्थच्या आत्म्याशी बातचीत करण्याची मागणी स्टीव हफकडे केली.

स्टीव हफने या मागणीला दाद देत सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशी बातचीत करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धार्थच्या आत्म्याशी बातचीत करतानाचा स्टीवचा हा खूप छोटा सेशन होता. यावर स्टीव सांगतो की,अधिक वेळ प्रतिक्षा केल्यानंतर तो सिद्धार्थच्या आत्म्याशी बोलू शकला. यानंतर स्टीव लवकरंच एक मोठा सेशन करणार आहे. ज्यात तो सिद्धार्थशी सर्व प्रकारच्या गोष्टी बोलू शकेल. या मोठ्या सेशनसाठी सिदनाज चाहत्यांनी स्टीवला स्पेशल मेसेज दिला की, स्टीव सिद्धार्थ शुक्लाला त्याच्या कुटुंबिय आणि शेहनाजबद्दल प्रश्न विचार.

- Advertisement -

स्टीवने सिद्धार्थशी बोलणे सुरु केले तेव्हा सिद्धार्थ स्ट्रीट डॅग्सबद्दल काही गोष्टी सांगू लागला. सिद्धार्थ शुक्लाचे रिअल लाईफमध्ये देखील डॅग्सवर खूप प्रेम करायचा. तसेच सोशल मीडिया अकाऊंटवरून रस्त्यावरील भुक्या डॅग्सला खाणं देण्यासंदर्भात आवाहन करायचा. यातून तो आपल्यासोबतच आपण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घेतली पाहिजे. असा मेसेज चाहत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करायचा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Steve Huff (@stevehuffofficial)

- Advertisement -

स्टीवने सिद्धार्थ शुक्लाशी बातचीत करतानाचा एका छोटा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी बातचीत आता एक मोठा व्हिडिओ शेअर करण्याची मागणी केली आहे. मात्र हा व्हिडिओमधील पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी खऱ्या असल्याचा दावा आम्ही करत नाही. मात्र चाहत्यांच्या इच्छेखातर स्टीवने ही मागणी पूर्ण केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही स्टीव हफने सुशांतच्या आत्म्याशी बातचीत करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती देखील मिळाली.

सुशांतनंतर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मृत्यू झाला यावर त्य़ाचा कुटुंबियांप्रमाणे चाहत्यांनाही विश्वास ठेवणं अवघड झालं होतं.


- Advertisement -