घरफिचर्सयह तो बदनाम चोरों की गलियाँ है!

यह तो बदनाम चोरों की गलियाँ है!

Subscribe

कल्याण शहरापासून जवळच असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांच्या ताफ्यावर या वस्तीतील महिला आणि तरुणांनी हल्ला करून पोलिसांना अक्षरशः पळवून लावले आहे.

कल्याण शहरापासून जवळच असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांच्या ताफ्यावर या वस्तीतील महिला आणि तरुणांनी हल्ला करून पोलिसांना अक्षरशः पळवून लावले आहे. सोनसाखळी चोरी, बोलबच्चन गँग आणि दुचाकी चोरांची वस्ती म्हणून बदनाम झालेली अंबिवलीतील इराणी वस्तीत हजारोंच्या संख्येने इराणी नागरिक राहण्यास आहे. गोरा वर्ण, धिप्पाड शरीरयष्टी असणार्‍या इराणी नागरिकांना बघून भल्याभल्याची पाचावर धारण बसते. यांच्या महिला देखील दिसायला गोर्‍या गोमट्या, धिप्पाड आणि तेवढ्याच आक्रमक देखील आहे.

या वस्तीत राहणारे बहुतांश पुरुष मंडळी सोनसाखळी चोरीच्या गुन्हे करतात आणि त्याच्या महिला हे सोनं विकण्यासाठी त्यांना मदत करतात. मुंबई, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भायंदर ते वसई विरार शहरामध्ये होणार्‍या सोनसाखळी चोरी, बोलबच्चन गिरी करून फसवणूकीचे गुन्ह्यात या टोळीचा समावेश आहे. एका दिवसात एका शहरात लागोपाठ चार ते पाच सोनसाखळ्या चोरी करून वस्तीत काही दिवस लपून बसायचे आणि पोलीस अटक करण्यासाठी वस्तीत आल्यावर महिलांना पुढे करून वस्तीतून पसार व्हायचे ही येथील चोरांची गुन्हे करण्याची पद्धत आहे.

- Advertisement -

२००८ सालापासून अटक करण्यासाठी वस्तीत येणार्‍या पोलिसावर हल्ले करायचे आणि त्यांना पिटाळून लावायचे अशी पद्धत या टोळ्यांनी सुरू केली होती. एका चोराला पकडण्यासाठी पोलिसांना या वस्तीत यायचे म्हटले की, पूर्ण पोलीस फौजफाट्यासह यावे लागते, त्यानंतर देखील पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या इराणी वस्तीत कारवाईसाठी जायचे आहे’, असा संदेश पोलिसांना मिळाला की पोलिसांना पण धस्स व्हायचे आणि पोलीस कारवाईसाठी येणार याची खबर इराणी वस्तीमधील रहिवाशांना मिळाली की येथील रहिवासी आक्रमक भूमिका घेऊन प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हायचे. थेट गुन्हेगाराचा पाठलाग करीत वस्तीत घुसण्याची पोलिसांनी कधीच हिंमत केली नाही. पोलीस आले की, या वस्तीमधील महिला मोठया संख्येने पुढे येऊन पोलिसांना प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहत असत. मुंबई तसेच ठाणे पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोर गुन्हेगाराना पकडण्यासाठी अनेक वेळा या वस्तीत कॉम्बिग ऑपरेशन राबवून अनेक सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई, ठाणे पोलिसांनी यापूर्वी अनेक इराणी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत, मात्र जामिनावर बाहेर सुटल्यानंतर या टोळीचे सोनसाखळी चोरीचे धंदे काही बंद झालेले नाही. पूर्वी सोनसाखळी चोरी हा गुन्हा चोरीचा गुन्हा म्हणून पोलीस ठाण्यात नोंद होत असल्यामुळे हे चोर एका आठवड्यात तुरुंगातून जामिनावर बाहेर पडत होते. मात्र सोनसाखळीच्या चोरीच्या गुन्ह्यात अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, तर काही महिलांना आपला जीव देखील गमवावा लागल्यामुळे या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन गुन्ह्याच्या कलमात वाढ करून ’जबरी चोरी’ (कलम ३९२) हे कलम लावण्यात आले आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात कमीत कमी ३ महिने जामीन मिळत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीचे गुन्ह्यात थोडीफार घट झालेली दिसून आली.

- Advertisement -

त्यानंतर या इराणी टोळ्यांनी आपली गुन्ह्याची पद्धत बदलून बोलबच्चनगीरी करून वाटसरूना लुटण्याचा नवा मार्ग सुरू केला. शरीराने धिप्पाड असल्यामुळे, तसेच अनेक वेळा तुरुंगवारी केल्यामुळे पोलिसांची पद्धत या टोळ्यांनी आत्मसाद केली आणि महिला,वृद्धांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचा धंदा या टोळ्यांनी सुरू केला.
ठाणे पोलीस आयुक्तपदाचे सूत्र परमबीर सिंग यांनी हाती घेतल्यानंतर इराणी टोळीची जागेवरच नाकाबंदी करण्यात आली होती. तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून या इराणी टोळीला सळो की पळो करून सोडले होते. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू केल्यानंतर या टोळीतील म्होरके, व त्यांच्या महिला भूमिगत झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील सोनसाखळी चोरीवर बर्‍यापैकी नियंत्रण आले होते.

त्यावेळच्या तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या एका बैठकीत इराणी गुन्हेगारांचे मन परिवर्तन करता येईल का असा विचार करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली. कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले.

हे पथक इराणी वस्तीमधील गुन्हेगारांसह तेथील वस्तीचे मनपरिवर्तन करण्याचा, त्यांना गुन्हेगारी विश्वातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्या ठिकाणी लपून बसणार्‍या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू लागले. जे निर्दोष आहेत, त्यांना तात्काळ सोडण्यात येऊ लागले. पोलिसांकडून येथील वस्तीतील रहिवाश्यांना पैसे कमावण्याचा सरळ मार्ग दाखवला होता, दुकाने टाका, भाजी विका, फेरीचा व्यवसाय करा,महिलांनी पोळीभाजी केंद्र सुरू करा, मुलांचे शिक्षण करून त्यांना शिक्षित बनवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र या वस्तीतील काहींनी आपले व्यवसाय सुरू केले. मात्र काहींनी झटपट पैसे कमवण्यासाठी चोरीचे धंदे सुरूच ठेवले.

हेही वाचा –

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -