घरमनोरंजननाट्यसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 'राडा' आणि 'गटार' गाजले

नाट्यसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘राडा’ आणि ‘गटार’ गाजले

Subscribe

९९व्या नाट्यसंमेलनाच आज दुसरा दिवस. आज राज्यभरातून आलेल्या विविध संस्थाच्यावतीने सामाजिक विषयावर बेतलेल्या नाटकांचे सादरीकरण होत आहे.

नागपूर येथे ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. आज संमेलनाचा दुसरा दिवस असून राज्याच्या विविध भागातून आलेल्या संस्थांनी सामाजिक विषयांवरील नाटके सादर केली. यामध्ये बहुजन रंगभूमी संस्थेच्यावतीने ‘गटार’ हे नाटक, नाट्य परिषद शाखेतर्फे ‘राडा’ एकांकिका, नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीने ‘विश्वदाभिरामा’ हा दीर्घांक, इचलकरंजी शाखेच्यावतीने ‘अफू’ ही एकांकिका सादर होणार आहे. याशिवाय सांगली शाखेच्या वतीने ‘तेरे मेरे सपने’, नाशिक शाखेच्यावतीने ‘तो ती आणि नाटक’, अहमदनगर शाखेच्यावतीने ‘लाली’ एकांकिका सादर होणार आहे.

‘गटार’ एक भयानक वास्तव

गटार आणि नाला सफाई कामगार, त्यांच्या समस्या, त्यांचे भयावह जीवन, ते जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि दुर्दैवाने पालिका, सरकारकडून त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष. लोकांकडून होणारी त्यांची अवहेलना याचे वास्तववादी चित्रण ‘गटार’ नाटकातून करण्यात आले. अशिक्षित, अडाणी सफाई कामगार आणि या समाजातील लोकांवर पीएचडी करण्यासाठी दिल्ली विद्यापीठातून आलेली एक विद्यार्थिनी आणि कामगार यांच्यातला शाब्दीक आणि वैचारिक संघर्ष दाखवण्यात आला.

- Advertisement -

gatar play at nagpur

तसेच सफाई काम करणारे आई-वडील आणि चिकाटीने, जिद्दीने बीएससीचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा यांच्यातील उत्तम नात्याची गुंफणही दाखवण्यात आली आहे. मुलाची शिकून मोठे व्हायची, आपल्या आई-वाडीलींना या दलदलीतून बाहेर काढण्याची जिद्द आणि सफाई कामगारांच्या सर्वांगीण विकास करायचा हे त्याचे स्वप्न आहे. हे सगळं ‘गटार’ नाटकातून चितारण्यात आलं. नाटकातील बहुतांशी संवाद हे वैदर्भीय भाषेतील होते.

- Advertisement -

स्त्री विरुद्ध पुरुष नुसता ‘राडा’

स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी समज आजही अनेक पुरूषांची आहे. असाच एक उन्मत्त पुरुष. स्त्रियांना पायातली वहाण म्हणून वापरणं यात पुरुषार्थ मानणारा. मात्र त्याच्या आयुष्यात आलेली एक स्त्री कशाप्रकारे त्याला धडा शिकवते आणि पोलिसांच्या ताब्यात देते. याचं थराराक सादरीकरण ‘राडा’ या नाटकात करण्यात आलं आहे.

rada drama at nagpur
स्त्री आणि पुरुष यांच्यातला ‘राडा’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -