नेत्यांसाठी राजकारण हा एक व्यवसाय झालाय….महाराष्ट्रातील राजकारणावर अभिनेता दिव्येंदू शर्माचं ट्विट

मंगळवारपासून एकामागेएक अश्या अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देत आहेत

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी उलथापालथ होत आहे. मंगळवारपासून एकामागेएक अश्या अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मिर्झापूर फेम अभिनेता दिव्येंदु शर्मानं देखील महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. दिव्यांदुने आपल्या ट्विटर अकाउंटवर राजकीय पक्षाचा नाव न घेता राजकीय स्थितीवर खोचक टिका केली आहे.

दिव्येंदुने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “सेल..सेल…सेल….आमदार घ्या….या कथित नेत्यांसाठी राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे”. दिव्येंदुचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटला अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

दिव्येंदुच्या या ट्विटवर युजर्स अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये एकजणाने लिहिले की, अगदीच बरोबर आहे सर, मी याच्याशी सहमत आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, जनता टॅक्स देत राहिली आणि नेते मजा घेत राहिले. अशा अनेक गमतीशीर प्रतिक्रिया युजर्स दिव्येंदुच्या ट्विटवर करत आहेत.

दिव्येंदु शिवाय यापूर्वी आरोह वेलणकर, किरण माने, हेमंत ढोमे यांनी सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणावर आपले मत मांडले होते.


हेही वाचा :  लै हस्तोय च्यायाला….आमदार, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत