घरमनोरंजनविदेशी रॅपरने चक्क चोरले 'या' गाण्याचे संगीत

विदेशी रॅपरने चक्क चोरले ‘या’ गाण्याचे संगीत

Subscribe

अनेकदा संगीत चोरल्याचे आरोप संगीत दिग्दर्शकावर होत असतात. देश पातळीवर, भाषा पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे वाद सुरुच असतात. त्यामुळे टी-पेनची ही घटना पहिली वेळ नाही.

एखाद्या विदेशी गाण्याचे संगीत चोरल्याचा आरोप अनेकदा भारतीय संगीतकारांवर लावण्यात येतो. पण आता चक्क एका हिंदी गाण्याचे संगीत एका विदेशी रॅपरने चोरले असल्याचा आरोप नेटीझन्सनी केला आहे. टी-पेन असे या रॅपरचे नाव असून त्याने गायक अर्जिंत सिंगने गायलेल्या ‘क्यूकी तूम ही हो’ या गाण्याचे संगीत चोरल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्याचे हे गाणे सोशल प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

वर्षाअखेरीस नवीन बारा नाटके

आशिकी २ मधील गाणे

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा आशिकी २ हा सिनेमा २०१३ साली रिलीज झाला. जुन्या आशिकी सिनेमाचा हा रिमेक होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छाप पाडली नसली तरी या सिनेमातील गाणी हिट झाली. त्यापैकी ‘क्यूकी तूम ही हो’ हे गाणं देखील चांगलच प्रसिद्ध आहे. टी- पेन या पॉप रॅपरनचे पाच दिवसांपूर्वी Thats yo money’ नावाचे गाणे रिलीज करण्यात आले. इन्स्टावरदेखील त्याने गाणे पोस्ट केले. पण त्याने हे गाणे टाकताच या गाण्याचे संगीत हिंदी गाण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया लोकांनी द्यायला सुरुवात केली. संगीत चोरी केल्याच्या आरोपामुळे त्याचे हे गाणे युटयुबरवरुन हटवण्यात आले.

‘मणिकर्णिका’चा दमदार ट्रेलर लाँच!

ऐका टी-पेनचे गाणे

- Advertisement -

 संगीताचे आदान-प्रदान सुरुच असते

अनेकदा संगीत चोरल्याचे आरोप संगीत दिग्दर्शकावर होत असतात. देश पातळीवर, भाषा पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे वाद सुरुच असतात. त्यामुळे टी-पेनची ही घटना पहिली वेळ नाही. या आधी सुप्रसिद्ध संगीतकार संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांच्यावर अनेकदा संगीत चोरीचे आरोप लागलेले आहेत. तर अनेक परदेशी कलाकारांवरही अशा टिपण्ण्या झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच संगीत चोरी म्हणा किंवा आदान- प्रदान म्हणा सुरुच असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -