घरमहाराष्ट्रमाझ्या जीवाला धोका, धमक्या आल्या - उदय सामंत

माझ्या जीवाला धोका, धमक्या आल्या – उदय सामंत

Subscribe

माझ्या जीवाला धोका आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत अशी तक्रार म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.

माझ्या जीवाला धोका आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत अशी तक्रार म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. तसं पत्र त्यांनी पोलिसांना पाठवले देखील आहे. यामध्ये उदय सामंत यांनी बिल्डरांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, अज्ञातांकडून मला धमक्याचे फोन येत असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं आहे. आपण अनधिकृत विकासकामांच्या विरोधात भुमिका घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले म्हणून आता मला फोन करून जीवे मारण्याच्या धकम्या दिल्या जात आहेत असं देखील उदय सामंत यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

निलेश राणेंचा भ्रष्टाचाराचा आरोप

दरम्यान म्हाडाच्या लॉटरीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. रविवारी मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं निलेश यांनी म्हटलं आहे. मंगळवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषेदरम्यान त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘लॉटरीमध्ये म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या जवळच्या व्यक्तींना आणि शिवसैनिकांनाच दोन-दोन घरं कशी लागतात?’ असा सवाल निलेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

वाचा – मुंबई म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार – निलेश राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -