घरताज्या घडामोडीJhund : आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल बनवला, झुंड...

Jhund : आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल बनवला, झुंड पाहिल्यानंतर आमिरची पहिली रिअँक्शन

Subscribe

अमिताभ बच्चन यांनी सिनेमात अप्रतिम काम केलेय. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले पण झुंड हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे.

Jhund : फँडी आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे ( nagraj manjule ) यांनी थेट बॉलिवूडचे बादशाहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan )  यांच्यासोबत झुंड हा दमदार सिनेमा तयार केला. ४ मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी अभिनेता आमिर खान Aamir Khan )  उपस्थित होता. झुंड पाहिल्यानंतर आमिर खान भारावून गेला. आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम सिनेमा असल्याची प्रतिक्रिया आमिर खानने दिली.

सिनेमाचे स्क्रिनिंग संपल्यानंतर आमिर खानसह उपस्थित असलेले सगळ्यांनी नागराज आणि संपूर्ण टीमने उभे राहून टाळ्या वाजवल्या. सिनेमा पाहिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत आमिर म्हणाला, सिनेमा पाहून मी नि:शब्द झालोय. भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवण्यात आल्यात त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सिनेमाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. आम्ही २०-३० वर्षात जे काही शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल केला, असे मस्करीत आमिरने म्हटले. आमिरच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सर्वांना हसू लागले.

- Advertisement -

टी सीरीजने आमिर खानचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ

बिग बींचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा

- Advertisement -

आमिर खान पुढे म्हणाला, अमिताभ बच्चन यांनी सिनेमात अप्रतिम काम केलेय. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले पण झुंड हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे.

झुंड सिनेमाचे तोंडभरुन कौतुक केल्यानंतर आमिरने सिनेमातील सर्व कलाकारांची भेट घेतती.  त्यांना त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. सर्व कलाकारांनी घरी नेऊन आमिरने त्यांच्याशी गप्पा मारल्या. आमिरने त्याच्या मुलाचीही सर्व कलाराकारांशी ओळख करुन दिली.

मलाही मराठी सिनेमात काम करायचेय 

आमिर खानने झुंड सिनेमाचे कौतुक केल्यानंतर तुला मराठी सिनेमात काम करायचे आहे का ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावर आमिर म्हणाला हो मला मराठी सिनेमात काम करायचे आहे. नागराजने मला संधी दिली तर मी नक्कीच मराठी सिनेमात काम करेन. मी नुकतीच एक मुलाखत दिली त्यात मी असे म्हटलेय, असे आमिरने म्हटले.


हेही वाचा – Maharashtra Unlock : थिएटर्स १०० टक्के खुली होणार, कोणत्या मराठी चित्रपटांना होणार फायदा ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -