Kangna ranut: ‘अजान’च्या कौतुकाचा कंगनाचा थ्रो बॅक व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले स्वातंत्र्यापूर्वी…

मला त्यांची भाषा कळत नाही पण मला अजान ऐकायला आवडते

praising azan kangna ranaut Throwback video viral on social media
Kangna ranut: 'अजान'च्या कौतुकाचा कंगनाचा थ्रो बॅक व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले स्वातंत्र्यापूर्वी...

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेल्या कंगनाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना तिला ‘अजान’ आवडत असल्याचे म्हणत आहे. कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकांनी ही स्वातंत्र्य मिळण्याआधीची कंगना असल्याचे म्हटले आहे. नुकताच कंगनाने एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक असल्याचे म्हटले. २०१४साली देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे कंगनाने वक्तव्य केले. कंगनाच्या या वक्तव्यावर आजही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता कंगनाच्या जुन्या व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जवळपास चार वर्षांपूर्वी अजान वरुन गायक सोनू निगमवर झालेल्या वादविवादावर कंगनाचे मत विचारले होते. एका कार्यक्रमात बोलताना कंगनाने म्हटले होते की, मला इतर कोणाचे माहिती नाही पण मला स्वत:ला अजान खूप आवडते. कंगनाने या कार्यक्रमात पुढे असे देखील म्हटले आहे की, आम्ही तनु वेड्स मनुच्या शुटींगच्या वेळी आसपासच्या परिसरात आम्हाला अजान ऐकायला यायची. मला त्यांची भाषा कळत नाही पण मला अजान ऐकायला आवडते असे कंगनाने म्हटले आहे. इतर धर्मातील भगवतगीता असो किंवा गुरुद्वारातील पूजा, चर्च असो किंवा मस्जिद असो मला या सर्व गोष्टी आवडतात असे कंगनाने म्हटले होते.

कंगनाचा हा थ्रो बॅक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलेच धारेवर धरल्याचे व्हिडिओच्या कमेंटमधून पहायला मिळाले. स्वातंत्र मिळण्याआधीची कंगना असे अनेकांनी म्हटले आहे तर अनेकांनी कंगनाला गिरगिट म्हणजेच कंगना सरडा असल्याचे देखील म्हटले आहे. कंगना म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या फायद्याचा विचार करुन आपले रंग बदलणारा सरडा असल्याचे अनेक युझर्सनी म्हटले आहे.


हेही वाचा – Kangna Ranaut: मुंबईतील शीख संघटनेकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल