Kangna Ranaut: मुंबईतील शीख संघटनेकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल

शीख समुदायाच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टमध्ये अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.

Kangana Ranaut controversy Complaint filed against Kangana by delhi Sikh gurudwara management committee
Kangna Ranaut: मुंबईतील शीख संघटनेकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल

सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत काही शांत होण्याचे नाव घेत नाहीये. यावेळी कंगना पुन्हा एकदा अडचणीत आलीय. शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी आतंकवाद्यांसोबत केल्याने कंगना चांगलीच चर्चेत आली होती. कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने सोमवारी कंगनाविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात आज मंगळवारी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कंगनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. शीख समुदायाच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टमध्ये अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.

दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने कंगनाविरोधात कलम २९५ (अ) आणि भारतीय दंड संहिता आणि इतर कलमांखाली तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे जेणेकरुन भविष्यात कंगना पुन्हा आपला कुटील आणि दृष्ट प्रचार करणार नाही,असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते त्यावेळीस कंगनाने जाणून बुजून शेतकऱ्यांचा निषेध केला आणि त्यांना खलिस्तानी आंतकवादी म्हणून संबोधले. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याविरोधात अपमानजनक भाषा वापरली.  १९८४ आणि त्याआधी झालेल्या नरसंहाराचे वर्णन त्यावेळच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून सुनियोजित असल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे पुढे असे देखील म्हणण्यात आले आहे की, शिखांना इंदिरा गांधींच्या पायाखाली चिरडण्यात आले. त्यांचे हे विधान अत्यंत निंदनीय असून शीख धर्मीयांचा अपमान केला आहे त्यामुळे जगभरातील शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत देशातील १९४७ साली मिळालेले स्वातंत्र ही भीक असून देशाला खरे स्वातंत्र हे २०१४ साली मिळाल्याने म्हटले होते. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये कंगनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – Anupama: माधवी गोगटे यांच्या निधनानंतर कलाकरांनी आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली