सेलिब्रिटी फॅशन डिझायनर प्रत्युषाचा संशयास्पद मृत्यू

बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइडची एक बॉटलही सापडली आहे. तिने स्टीम घेताना कार्बन मोनोऑक्साइड घेतले होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असं सांगण्यात येतंय.

टॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी आली आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर (Celebrity Fashion Designer) प्रत्युषा गारिमेला हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या बाथरूममध्ये तिचा मृतदेह सापडला. तसेच, बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइडची एक बॉटलही सापडली आहे. तिने स्टीम घेताना कार्बन मोनोऑक्साइड घेतले होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असं सांगण्यात येतंय. फॅशन डिझायनर प्रत्युषाच्या निधनानंतर कलाक्षेत्रातील मंडळींना दुःखद धक्का बसला आहे. (Prathyusha celebrity fashion designer found dead in bathroom)

हेही वाचा – ‘पुष्पराज’ अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत काम केल्याने FIR दाखल

प्रत्युषाने बाथरुममध्ये कोळसा आणि स्टीम घेतले होते. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगर या भागामध्ये प्रत्युषा राहत होती. एएनआयच्या रिपोर्टनुसार, प्रत्युषाच्या बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइड मिळालं आहे. तपास सुरु असताना हा संशयास्पद मृत्यू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – रॉकस्टार जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, व्हिडीओ शेअर करत जस्टिनने केला ‘या’ आजाराचा खुलासा

“प्रत्युषाने बंजारा हिल्स स्थित आपल्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली आहे. प्रत्युषाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाले आहे. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. प्रत्युषाच्या वडिलांनी तक्रार केली असून त्यांनी कोणावरही आरोप केलेला नाही. प्रत्युषा गेले काही दिवस डिप्रेशनमध्ये होती, त्यामुळे तिच्या मृत्यूमागे कोणाचाही हात नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं”, अशी माहिती बंजारा हिल्सचे पोलीस अधिकारी नागेश्वर राव यांनी दिली.