प्रवीण तरडे यांना ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मु. पो ठाणे’ या चित्रपटांसाठी शाहीर दादा कोंडके पुरस्कार प्रदान

चित्रपटांचे उत्तम विषय यांमुळे हे दोन्ही चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनीच केले होते

‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मु. पो ठाणे’ या चित्रपटांमुळे मागील अनेक दिवसांपासून दिग्दर्शक,लेखक आणि अभिनेता प्रवीण तरडे त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटांचे उत्तम विषय यांमुळे हे दोन्ही चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनीच केले होते. आत्ता त्यांना या चित्रपटांसाठी यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत सांगताना नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांना शाहीर दादा कोंडके पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी एक फोटो सुद्धा शेअर केला जो त्यांना पुरस्कार मिळाल्या दरम्यानचा आहे.

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये, “शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ – सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक यंदाचा हा मानाचा पुरस्कार ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मु.पो ठाणे’ या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळाला.या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित”.

तसेच ‘धर्मवीर मु.पो ठाणे’ या चित्रपटाचे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन संघर्षावर आधारित होतो. अभिनेता प्रसाद ओकने यात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. तर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केले होते. शिवाय सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका सुद्धा त्यांनी साकारली होती. प्रवीण तरडेंच्या हे दोन्ही चित्रपटांनी मराठी ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती.

 


हेही वाचा :प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस