घरमनोरंजनजय माँ कलकत्ते वाली,तेरा श्राप ना जाये खाली..., काली प्रकरणादरम्यान अनुपम खेर...

जय माँ कलकत्ते वाली,तेरा श्राप ना जाये खाली…, काली प्रकरणादरम्यान अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत

Subscribe

अभिनेते अनुपम खेर अनेकदा विविध घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. दरम्यान त्यांनी काली प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे

मागील काही दिवसांपासून दिग्दर्शक लीना मणिमेकलई तिच्या ‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे चर्चेत आहे. या पोस्टरमुळे सोशळ मीडियावर तसेच भारतातील अनेक भागांतून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया मांडत एक ट्वीट शेअर केले आहे.

अनुपम यांचं ट्वीट चर्चेत
अभिनेते अनुपम खेर अनेकदा विविध घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. दरम्यान त्यांनी काली प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “शिमलाचं एक कालीचं प्रसिद्ध मंदिर आहे. कालीबाडी. जिथे मी लहानपणी खूपदा जायचो. तिथे बूंदीचा प्रसाद आणि गोड चरणामृत प्रसाद म्हणून दिलं जायचं. त्या मंदिराबाहेर एक साधू बसलेले असायचे आणि ते सतत ‘जय मां कलकत्ते वाली, तेरा श्राप ना जाये खाली…’ असं वाक्य म्हणायचे. आजकाल मला त्या साधूंची आणि त्या मंदिराची खूप आठवण येतेय.”

अनुपम खेर यांच्या या ट्वीटवरून असं वाटतंय की ते लीना आणि तिच्या चित्रपटाकडे इशारा करत आहेत. या ट्वीटवर अनेक युजर्स कमेंट देखील करत आहेत. त्यापैकी एकाने लिहिलंय की,”घाबरू नका. ते साधू आता या जगात असतील किंवा नसतील पण काली मातेचा राग आजही तसाच आहे आणि भविष्यातही तसाच राहिल.”

- Advertisement -

दरम्यान, सध्या या पोस्टरवरून लीना मणिकलाईवर अनेक टिका केल्या जात आहेत. तसेच तिला अटक करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा :प्रवीण तरडे यांना ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मु. पो ठाणे’ या चित्रपटांसाठी शाहीर दादा कोंडके पुरस्कार प्रदान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -