घरमनोरंजनप्रिती झिंटाच्या सुनावणीला न्यायाधीशच कंटाळले!

प्रिती झिंटाच्या सुनावणीला न्यायाधीशच कंटाळले!

Subscribe

येत्या ९ ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असून 'एकदाचं संपवा हे' असं न्यायालयाने प्रिती झिंटा आणि नेस वाडियांना बजावलं आहे. त्यामुळे कदाचित येत्या ९ तारखेला या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं अपेक्षित आहे.

अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाबची को ओनर प्रिती झिंटाच्या एका प्रकरणाची सुनावणी २०१४पासून न्यायालयात सुरू आहे. पण या प्रकरणाची इतकी लांबलेली सुनावणी पाहून स्वत: न्यायाधीशच वैतागले आणि त्यांने अखेर ‘हे संपवा एकदाचं’, अशा शब्दांत सुनावलं आहे. विशेष म्हणजे समोरच्या पार्टीला सेटलमेंट करायची असूनही प्रिती मात्र ‘माफी मागायलाच हवी’ या मागणीवर अडून बसली आहे. त्यामुळे न्यायाधीश वैतागले असताना या प्रकरणाची सुनावणी घ्यावी लागत आहे. २०१४मध्ये प्रिती झिंटाचा तत्कालीन बॉयफ्रेंड नेस वाडिया याच्याविरोधा प्रितीने न्यायालायात केस दाखल केली होती. नेस वाडियाने आपला विनयभंग केल्याची तक्रार प्रितीने केली होती. यासंदर्भात न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर नेस वाडियाने स्वत:ची जामिनावर सुटका करून घेतली होती. मात्र, प्रत्येक वेळी देशाबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे त्याच्यावर बंधनकारक करण्यात आले.

प्रितीला हवी सेटलमेंट, पण माफीसह!

३० मे, २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यामध्ये नेस वाडियाने आपल्याला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार प्रितीने दिली होती. दरम्यान, यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रितीच्या वकिलांनी न्यायालयात दोन्ही पक्षकारांमध्ये समझोता होऊ शकत नसल्याचा दावा केला होता. आता १ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रिती झिंटाच्या वकिलाने प्रितीला सेटलमेंट हवी असल्याचं सांगितलं. पण लेखी नसली तरी जाहीर माफी नेस वाडियांनी मागावी अशी अट तिने घातली आहे.

- Advertisement -

‘प्रितीची केस गैरसमजातून’

दरम्यान, वाडिया यांनी मात्र प्रितीचे आरोप फेटाळले आहेत. गैरसमजातून हा सगळा प्रकार सुरू झाला असून प्रितीने वैयक्तिक राग काढण्यासाठी हे सगळं केल्याचा दावा वाडिया यांनी केला आहे. आपल्यावरील आरोपपत्र रद्द करण्यात यावं, अशी विनंती करणारी याचिका नेस वाडियांनी केली असून त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. प्रितीचं आता लग्न झालं असून ती आयुष्यात पुढे निघून गेली आहे, मात्र, वाडिया जामिनाच्या अटींमुळे तिथेच अडकले असल्याचा दावाही वाडियांच्या वकिलाने केला.

९ ऑक्टोबरला होणार पुढची सुनावणी

येत्या ९ ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असून ‘एकदाचं संपवा हे’ असं न्यायालयाने प्रिती झिंटा आणि नेस वाडियांना बजावलं आहे. त्यामुळे कदाचित येत्या ९ तारखेला या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -