घरमनोरंजनप्रियांका-निकच्या घरात नव्या पाहुण्याचे स्वागत

प्रियांका-निकच्या घरात नव्या पाहुण्याचे स्वागत

Subscribe

या गुड न्यूजमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या दोघांची जोडी सर्वाधिक पसंतीस उतरणारी जोडी म्हणून ओळखली जाते. गेल्या वर्षी १ डिसेंबरला या दोघांचे लग्न झाले होते. हे दोघं लग्न बंधनात अडकल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र नुकतीच प्रियांका आणि निकने त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. या गुड न्यूजमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

प्रियांका-निकच्या परिवारात तिसऱ्या पाहुण्याचे आगमन झाल्याची बातमी स्वतः प्रिय़ांका चोप्राने इन्स्टाग्रामवर दिली आहे. ही बातमी चाहत्यांसह शेअर करताना प्रियांकाने तिच्या नव्या कुटुंबातील सदस्याची ओळख फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दिली आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगत असून या फोटो आणि व्हिडिओला पसंती मिळत आहे.

- Advertisement -

या दोघांच्या घरातील नवा पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचा पाळीव प्राणी जीनो जोनस नावाचा कुत्रा आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हा त्यांचा कुत्रा निक सोबत मस्ती करताना दिसतोय. इन्स्टाग्रामवर प्रियांकाने शेअर केलेल्या कॅप्शन दिले की, ‘so much cute in the same frame. ??❤ happy almost anniversary baby.’


‘या’ १४४ कोटीच्या अलिशान बंगल्यात राहणार प्रियंका-निक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -