घरमनोरंजन'मी त्यांचा एकलव्य आहे' असं म्हणत प्रवीण तरडे यांनी राजामौलींचं केलं कौतुक

‘मी त्यांचा एकलव्य आहे’ असं म्हणत प्रवीण तरडे यांनी राजामौलींचं केलं कौतुक

Subscribe

'मी त्यांचा एकलव्य आहे' असं म्हणत प्रवीण तरडे यांनी राजामौलींचं केलं कौतुक. कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या व्यक्तीचे आदर्श असतात. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली(rajamouli)हे प्रवीण तरडे यांचे आदर्श आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये उत्तमपणे काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. (pravin tarade) प्रवीण तरडे स्वतःला राजामौली यांचे एकलव्य म्हणतात आणि त्यांना ते स्वतःचे आदर्श मानतात.

सध्या प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन असलेला धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे( dharmveer)हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतो आहे. आणि आता या आठवड्यात शुक्रवारी प्रवीण तरडे यांचा आगामी सिनेमा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वराज्याचे दोन्ही छत्रपती म्हणजेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्याच जीवनावर आधारित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या व्यक्तीचे आदर्श असतात. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली(rajamouli) हे प्रवीण तरडे यांचे आदर्श आहेत. प्रवीण तरडे (pravin tarade) त्यांच्याबद्दल नेहमीच उत्साहाने बोलत असतात. एवढंच नाही तर प्रवीण तरडे यांनी त्यांच्या ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ राजामौलींचा एक मोठा फोटोसुद्धा लावून घेतलेला आहे. त्या त्यामागील कारण सुद्धा खूप खास आणि अभिमानास्पद आहे. याबद्दल प्रवीण तरडे एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले की, ‘मी नेहमीच राजामौली सरांना माझा आदर्श मानत आलो आहे. आणि मी त्यांचा एकलव्य आहे पण ही गोष्ट सुद्धा माझ्या जवळच्याच मंडळींना माहीत आहे. मागच्या ७ वर्षांपासून माझ्या ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ राजामौली सरांचा फोटो आहे. मी रोज ऑफिसमध्ये जाताना आधी त्यांच्या फोटोकडे मिनिटभर पाहतो आणि मगच आत जातो, असंही प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे.

असं करण्यामागचं कारण काय हे विचारलं असता प्रवीण तरडेंनी त्यावर भाष्य केले. “या माणसाने जशी त्याच्याकडील प्रादेशिक चित्रपटाची दखल जगाला घ्यायला भाग पाडली, तसं माझ्या सिनेमाची दखल जगाने घ्यावी असं वाटतं.” मलासुद्धा माझ्या मराठी चित्रपट सृष्टीबद्दल तेवढंच प्रेम आहे, असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान धर्मवीरच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच प्रवीण तरडे यांनी राजामौली यांची भेट घेतली आणि त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून मी भावुक झालो, असंही प्रवीण तरडे म्हणाले. प्रवीण तरडे नेहमीच राजामौली यांच्याबद्दल बोलताना नेहमीच खूप भरभरून बोलत असतात. राजामौली यांच्यासारख्या एक समृद्ध दिग्दर्शकाचा आदर्श घेऊन प्रवीण तरडे (pravin tarade) यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये (maratahi film industry) महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ही गोष्ट कलाकार म्हणून प्रवीण तरडे यांच्यासाठी आणि प्रेक्षक म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानास्पद आहे. दरम्यान धर्मवीरच्या यशानंतर प्रेक्षक सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -