घरमनोरंजनपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात...मराठीचा डंका

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात…मराठीचा डंका

Subscribe

पीआयएफएफने 'जागतिक स्पर्धा' आणि 'मराठी स्पर्धा' या स्पर्धेसाठी निवडक चित्रपटांची घोषणा केली आहे.

पुणे शहरातील कोरोना सावटामुळे अनेक कार्यक्रम साजरे करण्यासाठी सरकारने पुर्णविराम दिला होता. परंतु आता अनलॉकनंतर पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुन्हा सुरू होणार आहे. अखेर पुणेकरांसाठी ११ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत सात दिवसांच्या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या फिल्म फेस्टिव्हलसाठी ७ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली असून, यावर्षीदेखील पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा डंका पाहायला मिळणार आहे. याअगोदर मार्चमध्ये हा कार्यक्रम होणार होता, परंतु हा चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आला. पीआयएफएफने ‘जागतिक स्पर्धा’ आणि ‘मराठी स्पर्धा’ या स्पर्धेसाठी निवडक चित्रपटांची घोषणा केली आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यातच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (PIFF) १९ वर्ष पूर्ण झाली. या महोत्सवाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पीआयएफएफला ‘प्रत्येकाला आशा देणारे ठिकाण’, अशी उपमा दिली आहे. हा महोत्सव शहरातील आणि राज्यातील फ्रंटलाइन वर्कर्सना समर्पित केला आहे.

यावर्षी हंगेरी, इराण, कॅनडा, व्हिएतनाम, स्लोव्हेनिया, सर्बिया आणि भारत या देशांतील ज्युरी सदस्य हा चित्रपट महोत्सव एका विशेष व्यासपीठावर म्हणजेच, ऑनलाइन पाहतील असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉ. पटेल म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १४ चित्रपटांची जागतिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच, ७ चित्रपटांची मराठी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

- Advertisement -

‘या’ मराठी चित्रपटांची झाली निवड 

मराठी चित्रपट विभागात, मकरंद माने दिग्दर्शित पोरगं मजेतय, विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांचा फिरस्त्या ,विवेक दुबे यांनी लिहिलेले फन’रल, सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित जून, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित गोदाकाठ,मकरंद अनासपुरे यांचा काळोखाच्या पारंब्या, विशाल कुदळे यांचा टक-टक, हे चित्रपट निवडण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील मराठी चित्रपटांचा न्यायनिवाडा करणारा हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे. हा चित्रपट महोत्सव ऑफलाइन तसेच ऑनलाईन या दोन्ही स्वरूपात असेल. चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी ‘शिफ्ट’२’ या सुरक्षित व्यासपीठाचा उपयोग करणारा पीआयएफएफ हा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठरला आहे.


हेही वाचा – प्रियदर्शन जाधवच्या ‘लव सुलभ’ चे पोस्टर लॉंच, चित्रिकरणालाही सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -