Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन तेलंगणात 'पुष्पा 2' च्या टीमचा बस अपघात

तेलंगणात ‘पुष्पा 2’ च्या टीमचा बस अपघात

Subscribe

टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावले. अशातच, सध्या ‘पुष्पा’ नंतर ‘पुष्पा 2’ चित्रपट देखील चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु असून या चित्रपटाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार, ‘पुष्पा 2’ च्या टीमचा चित्रीकरणाच्या प्रवासादरम्यान अपघात झाला आहे.

‘पुष्पा 2’ च्या टीमचा अपघात

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या टीमचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या टीमचा अपघात तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील नरकेटपल्ली भागात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टीमची बस दुसऱ्या बसला धडकली. यात काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांनी या घटनेबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. ही दु:खद बातमी समोर आल्यानंतर चाहते दुःख व्यक्त करु लागले आहेत.

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

- Advertisement -

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांचा चित्रपट ‘पुष्पा 2’ 2023 मध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही तारीख ठरलेली नाही. निर्मात्यांनी काही काळापूर्वी चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक रिलीज केला होता, जो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता.

 


- Advertisement -

हेही वाचा :

ही तर मुस्लीम… महाकाल मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

- Advertisment -