घरमनोरंजनराहुल-दिशा येत्या 16 जुलै रोजी अडकणार विवाह बंधनात,वैदिक पद्धतीने करणार लग्न

राहुल-दिशा येत्या 16 जुलै रोजी अडकणार विवाह बंधनात,वैदिक पद्धतीने करणार लग्न

Subscribe

राहुल वैद्य आणि दिशा परमार या पॉवर कपलची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलॉईंग आहे.

बिग बॉस फेम तसेच गायक राहुल वैद्य Rahul Vaidya) त्याच्या प्रेयसी म्हणजेच दिशा परमार (Disha Parmar) सोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या 16 जुलैला दोघेही विवाह करणार असल्याचे सोशल मीडीयावर घोषित केलं आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमार या पॉवर कपलची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलॉईंग आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ ते नेहमीच शेअर करतात. पण दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत आहेत. चाहते जाणून घेण्यासाठी खूप ऊत्सुक आहेत की दोघेही लव्ह बर्ड लग्नाच्या बेडीत कधी अडकणार आहेत. आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. राहुल नुकतच ‘खतरों के खिलाड़ी 11’ या रियालिटी शो केपटाऊन मधून परतला आहे. राहुलने सांगितले आहे की आम्ही दोघेही नेहमी क्लोज्ड वेडिंगच्या पक्षात आहेत. आमचा विवाह वैदिक पद्धतीन पार पडणार आहे तसेच विवाह सोहळ्यादरम्यान गुरबानी शब्द देखील गाणार आहेत.(Rahul and Disha will get married on July 16)

या आधीही दोघांच्या विवाहाच्या तारखेत अनेकदा अडचणी आल्या होत्या राहुल वैद्यने ईटाइम्समध्ये दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की त्यांनी कोरोना व्हायरसमुळे फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांनी अनेकदा त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. लग्नामध्ये सर्व मित्रपरिवार उपस्थित राहण्यासाठी त्यांनी लग्नाची डेट कॅन्सल केल्याचे स्पष्ट केलं होतं. आता येत्या 16 जुलैला दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – HBD: बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता रणवीर सिंग बद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहितेय का ?



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -