घरमनोरंजन'काला' सिनेमाला कर्नाटकात बंदी

‘काला’ सिनेमाला कर्नाटकात बंदी

Subscribe

रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला ‘काला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मात्रा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नवा वाद सुरू झाला आहे. कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून चित्रपट वितरकांनी ‘काला’ चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घातली आहे. ‘काला’वर बंदी घालण्यासाठी कानडी संघटनेच्या अनेक नेत्यांनी पत्रे पाठविली आहेत, असे ‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ चे अध्यक्ष सा. रा. गोविंदु यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कावेरी पाणी प्रश्नांवरून रजनीकांत यांच्या वक्तव्यामुळे कानडी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ते यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी, एसएस राजामौलींच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या विरोधातही कर्नाटकातील काही संघटनांनी आंदोलन केले होते. तेव्हा देखील अशाच प्रकारची समस्या समोर आली होती.

काला चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला असून, १२ तासांच्या आतच तो २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. सध्यातरी चित्रपटाचा ट्रेलर तमीळ भाषेसोबतच हिंदीतही प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये रजनीकांतला गरीब आणि झोपटपट्टीत राहणाऱ्या लोकांचा मसीहा दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचे सर्वाधिक चित्रीकरण मुंबईतल्या धारावी भागात झाले. गरिबांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नायकाच्या रुपात रजनीकांत यांना दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

कालामध्ये चित्रपटात नाना पाटेकर एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारत आहे. नाना पाटेकरांना अत्यंत क्रूर दाखवण्यात आले आहे. “जो माझ्या विरोधात असेल, तो मरणार”, चित्रपटातला नानांचा हा डायलॉग सध्या गाजतोय. रजनीकांतची एंट्रीही रोमांचक दाखवण्यात आली आहे. तसेच त्याचे डायलॉगही भारी आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाला आहे. ‘काला’ हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -