घरमनोरंजनराजकुमारच्या विगमुळे मला खूप त्रास झाला... शर्मिला टागोर यांनी सांगितला 'तो' किस्सा

राजकुमारच्या विगमुळे मला खूप त्रास झाला… शर्मिला टागोर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Subscribe

60-70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर शर्मिला टागोर यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. 60-70 च्या दशकापासून त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ रुपेरी पडद्यावर गाजवला. आजही त्यांचे अनेक चाहते आहेत. शर्मिला यांची मोठी मुलगी सबा अली खान नेहमीच त्यांचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चित्रपटाच्या सेटवरील किस्से आणि घटना ऐकण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज अभिनेते राजकुमार यांच्याबाबत एक खास किस्सा सांगणार आहोत.

राजकुमारच्या विगमुळे झाला त्रास
60-70 च्या दशकात राजकुमार आणि शर्मिला टागोर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शर्मिला टागोर आणि राजकुमार यांच्याशी संबंधित हा किस्सा 1965 मधील आहे. जेव्हा ते यश चोप्रा यांच्या ‘वक्त’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी नैनितालला जात होते. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी स्वतः हा मजेदार किस्सा सांगितला, “मला आठवतं, जेव्हा आम्ही चित्रपटाच्या शूटसाठी नैनितालला जात होतो, तेव्हा मी गाडी चालवत होते. त्यावेळी राजकुमार विग वापरायचे. त्याकाळी गाडीमध्ये एसीची सुविधा नव्हती आणि राजकुमारने विग घातल्यामुळे आम्ही खिडकी उघडू शकत नव्हतो. त्याचा विग उडू नये म्हणून त्याने डोक्यावर रुमाल बांधला. त्याच्या केसांमुळे मला खूप त्रास सहन करावा लागला होता.”

- Advertisement -

शिवाय राजकुमार यांच्या व्यतिरिक्त तिथे शशी कपूर देखील होते. शर्मिला टागोर यांना तेव्हा ड्रायव्हिंगचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे जेव्हा त्या गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवर बसली तेव्हा शशी कपूर घाबरले. ‘वक्त चित्रपटात शर्मिला टागोर यांच्यासोबतच साधना, सुनील दत्त, शशी कपूर, राज कुमार आणि बलराज साहनी हे प्रमुख भूमिकेत होते.

शर्मिला टागोरच्या यांनी फक्त हिंदी मध्येच नाही तर बंगाली चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट 1959 मध्ये ‘अपूर संसार’ नावाचा बंगाली चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्यजित रे यांनी केले होते. यानंतर शर्मिलाने ‘दाग’, ‘पाप और पुण्य’, ‘अमर प्रेम’, ‘माय लव्ह’, ‘आराधना’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये हेमा मालिनींची उपस्थिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -