तुमची हत्या करण्यासाठी गँग तयार… राम गोपाल वर्मांनी दिला दिग्दर्शक राजामौलींना सतर्कतेचा इशारा

टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राजामौलींच्या RRR चित्रपटाने जागतिक दर्जाचे तीन प्रतिष्ठात पुरस्कार जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जगभरात राजामौलींचे आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजामौली यांना मिळत असलेल्या यशामुळे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी सावधान राहण्याचा ईशार दिला आहे.

राजामौलींच्या जीवाला धोका?

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मां सतत त्यांच्या विविध ट्वीटमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एक ट्वीट शेअर केलंय ज्यातून त्यांनी राजामौलींच्या जीवाला धोका असण्याचं सांगितलं आहे. यावेळी ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “एसएस राजामौली तुम्ही जवळपास प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाला मागे टाकलं आहे. ज्यांनी अनेक चांगले चित्रपट बनवले ज्यात मुगले आजम ते आसिफ, शोले चित्रपटाचे रमेश सिप्पी, सोबतच करण जौहर आणि भंसाळी सारखे दिग्दर्शक आहेत.”

तसेच त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “एसएस राजामौली सर तुम्ही कृपया तुमची सुरक्षा वाढवा. कारण भारतीय दिग्दर्शकांचा एक गट आहे, जो तुमच्या सफलतेवर जळत आहे. त्यांनी तुमची हत्या करण्यासाठी गट तयार केला आहे. ज्यातील मी देखील एक भाग आहे आणि मी हे रहस्य सांगतोय कारण मी 4 पेग घेतले आहेत.”

दरम्यान, राम गोपाल वर्मांनी केलेल्या ट्वीटवर अजून राजामौलींनी कोणतीही प्रतिक्रिया देलेली नाही परंतु ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा :

तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देत आहेत, अभिनेते प्रभाकर मोरे आणि विजय पाटकर