Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन रणविजय सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा,चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

रणविजय सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा,चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

रणविजयची पत्नी प्रियाकांने दुसऱ्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Related Story

- Advertisement -

टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेता तसेच लोकप्रिय सूत्रसंचालक रणविजय सिंहने (rannvijay singha)सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. नुकतच रणविजयच्या घरी एका चिमुरड्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोमवारी म्हणजेच 12 जुलै रोजी रणविजयची पत्नी प्रियाकांने दुसऱ्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाळाच्या आगमणाने रणविजय अत्यंत खूश दिसत असून त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. रणविजयने, एका लाल आणि काळ्या रंगाची लहान मुलाची जर्सी आणि शूजचा फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘#सत्नामवाहेगुरु’ असं लिहलं आहे. रणविजयच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत रणविजयचं अभिनंदन केलं आहे. रणविजय आणि पत्नी प्रियांका वोहरा यांनी सहा वर्षापूर्वी लग्नगाठ बांधली होती. तसेच त्यांना आणखी एक मोठी मुलगी देखील आहे.(Rannvijay Singha became father for the second time, shared good news with fans)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

- Advertisement -

रणविजय आणि प्रियांकांच्या लव स्टोरी बद्दल बोलायचे झाल्यास त्यांची भेट एका कॉमन फ्रेंडमूळे झाली होती. दोघांच्या भेटी-गाठी वाढू लागल्या. यानंतर काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी २०१५ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘केनिया’मध्ये लग्न केले. रणविजय आणि प्रियांका यांच्या मोठ्या मुलीचे ‘कायनात’ असून ती ४ वर्षांची आहे. आत्ता प्रियांकाला दुसरा मुलगा झाला आहे. एका मुलाखतीत रणविजयने वडील झाल्यावर मी अजून जबाबदार झालो आहे असे सांगितले होते.हे हि वाचा – मी तर विसरेन, पण सायराजी कसं सहन करतील ? नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक- Advertisement -

 

- Advertisement -