Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रात्रीस खेळ चाले ३ मध्ये अण्णा नाईकांच्या नव्या भूमिकेचा खुलासा

रात्रीस खेळ चाले ३ मध्ये अण्णा नाईकांच्या नव्या भूमिकेचा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून रात्रीस खेळ चाले ३ या आगामी मालिकेची चर्चा रंगली असताना अण्णा नाईक नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसतील याबाबत उत्सुकता ही प्रेक्षकांमध्ये होती. पण आता त्यांच्या या भूमिकेचा खुलासा स्वत: अण्णा नाईक यांनी केला आहे.

Related Story

- Advertisement -

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ च्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली असताना त्यात अण्णा नाईक कोणत्या रुपात दिसणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून या मालिकेत अण्णा नाईक एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचा खुलासा स्वत: अण्णा नाईक अर्थातच माधव अभ्यंकर यांनी एका मुलाखतीत केला.

रात्रीस खेळ चाले २ मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू झाल्याचे दाखवले होते. या मालिकेत अण्णा नाईक, शेवंता, चोंट्या अशा व्यक्तीरेखा होत्या. आता नव्या भागात हे कलाकार असणार का? याचीदेखील चर्चा सुरू आहे. तसेच आता येणाऱ्या तिसऱ्या भागात अण्णा नाईक कोणत्या रुपात दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अण्णा हे ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये एका भूताच्या रुपात दिसणार आहे,असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे  काय होणार, शेवंता पुन्हा दिसणार का? अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. नाईकांच्या वाड्यात आणखी कोणत्या रहस्यमय गोष्टी घडणार आहेत. तसेच दत्ता, सुशमा, पांडू, अभिराम, छाया, अण्णा नाईक , माई, शेवंता यांची गूढ कथा पुन्हा समोर येणार का, आता हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.


- Advertisement -

हे ही वाचा- http://बाळासोबत करीना कपूर घरी परतली

- Advertisement -