घरमनोरंजनआठवणीतले गीतरामायण

आठवणीतले गीतरामायण

Subscribe

पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या आणि त्यासाठी नव्या संकल्पनेला आधार देणार्‍या निर्मात्यांना दादच द्यावी लागेल. सादरीकरणात नावीन्य असेल तर प्रेक्षक येतात हा फॉर्म्युला सर्वच आयोजकांनी वापरलेला आहे. आता नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्या गीतरामायणला जगभर पसरवले त्या ग. दि. मा. आणि बाबुजी यांच्या सान्निध्यात संपूर्ण गीतरामायण ज्यांनी अनुभवले ते आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके गीतरामायणच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहेत.
आठवणीतले गीतरामायण या कार्यक्रमासाठी आनंद, श्रीधर सहभागी होणार आहेत. ग. दि. मांची गाणी आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर असा काहीसा मिलाफ फक्त आनंद देणारा ठरला नाही तर तो अजरामरही झालेला आहे. आजच्या संगीताने नवीन रुप जरी धारण केले असले तरी गीतरामायणची गोडी आणि ओढ अद्याप शमलेली नाही. निमित्त घेऊन जेव्हा म्हणून गीतरामायणचे प्रयोग झाले त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. ग.दि.मा आणि बाबुजी यांच्या जन्मशताद्बीचे निमित्त घेऊन सलग तीन प्रयोग करण्याचे ठरवलेले आहे. 29 ते 31 मार्च या दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -