‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रियाची भावनिक पोस्ट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

रियाच्या भावनिक पोस्टवर नेटकरी हिपोक्रेसी म्हणाले.

bollywood sushant singh rajput & Rhea Chakraborty
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती

आज सायंकाळी साडे सात वाजता अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून सुशांतच्या चाहत्यांपासून ते कलाकरांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांपासून ते कलाकर मंडळी या चित्रपटाबद्दल भावनिक पोस्ट टाकत आहेत. आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून खूप छान संदेश लिहिला आहे. तिने लिहिले आहे की, ‘मला तुला पाहण्यासाठी एक वेगळीच ताकद आतून लागणर आहे. तू इथे माझ्याबरोबर आहेस. मला माहित आहे की तू आहेस. मी तुला आणि तुझ्या प्रेमाला सेलिब्रेट करेन. माझ्या आयुष्यातला हिरो आहेस. हा चित्रपट तू आमच्या सोबत पाहशील हे मला माहित आहे. ‘

पण रियाची इन्स्टाग्रामवरील ही पोस्ट युजर्सना आवडली नाही. त्यांनी पुन्हा एकदा रिया ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. युजर्स तिच्या भावनेला फेक आणि ओव्हर अॅक्टिंग म्हणत आहेत.

एका युजरने लिहिले आहे की, ‘आता हे सर्व का करत आहेस?’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘व्वा, काय गेम खेळत आहेस तू?’ युजर्स रियाच्या पोस्टला हिपोक्रेसी म्हणत आहेत. रियाला यापूर्वी देखील सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. सुशांतच्या निधनानंतर रिया सतत सोशल मीडियावर ट्रोल जात होती. जेव्हा रियाने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली तेव्हा रियाला पहिल्यांदा ट्रोल केले गेले.


हेही वाचा – चाहत्यांनो सुशांतचा शेवटचा चित्रपट आज ‘या’ वेळेत होणार प्रदर्शित!