Sushant Sucide case: आता रिया म्हणते, माझ्याकडे सुशांतची ही एवढीच संपत्ती!

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येनंतर त्याची कथीत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वर सुशांतच्या वडिलांनी आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला. त्यामुळे ईडी सध्या रियाची कसून चौकशी करत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला आहे. तीन दिवस ही चौकशी चालणार आहे. काल पहिल्या दिवशी ईडीने तब्बल साडेआठ तास रियाची कसून चौकशी केली.

ईडीच्या चौकशी दरम्यान रियाच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान रियाने काही फोटो शेअर करत सुशांतच्या केवळ याच वस्तू आणि याची हिच संपत्ती माझ्याजवळ असल्याचं म्हटलं आहे. या वस्तूंमध्ये सुशांतनं रियासाठी लिहिलेली एक चिठ्ठी असून या चिठ्ठीमध्ये सुशांतनं रियासाठी भावुक अशा ओळी लिहिल्या आहेत. या चिठ्ठीमध्ये आयुष्यात आल्याबद्दल सुशांतनं रियाचे आभार मानले आहेत.

माझ्याकडे सुशांतच्या या दोनच संपत्ती

काय आहे त्या चिठ्ठीत

सुशांतने लिहीलेल्या त्या कागदावर लिहीले आहे की, “मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. माझ्या आयुष्यात लिल्लू (रियाचा भाऊ शोविक) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात बेबु (रिया) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात सर (रियाचे वडील) आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मॅम (रियाची आई) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात फज (कुत्रे) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.”

ईडीकडून रियाची शुक्रवारी जवळपास ५ ते ६ तास चौकशी झाली. सुशांतच्या बँक खात्यातून रियावर सुशांतच्या वडिलांनी १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते.