घरमनोरंजनPhoto : सलमानच्या फार्महाऊसवर लुलिया करतेय भाताची शेती!

Photo : सलमानच्या फार्महाऊसवर लुलिया करतेय भाताची शेती!

Subscribe

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान यांची खास मैत्रिण लुलिया वंतूर (lulia vantur) ही सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर राहत आहे. लॉकडाऊनच्या काळात सलमान खान त्यांच्या कुटुंबिय आणि काही जवळच्या मित्रांसोबत फार्महाऊसवर अडकला होता. तेव्हा लुलियादेखील त्यांच्यासोबत पनवेलमध्येच राहिली. नुकताच तिने सलमानच्या फार्महाऊसवरील शेतात भाताची लावणी केल्याचा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे लुलिया सलमानच्या शेतात काम करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (viral) होत आहे.

- Advertisement -

लुलियाने हा खास फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी गावी आल्यावर आजी – आजोबांसोबत अनेकदा शेतात पेरणी केली आहे. प्राण्यांच्या मागे धावले आहे. तेव्हा खुप आनंद वाटत होता. मात्र भाताची शेती करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. या पूर्वी कधीही धान्याची पेरणी केलेली नाही. त्यामुळे हा वेगळा आणि नवीन अनुभव आहे. हा सर्व अनुभव मी माझ्या यु ट्यूब (you tube) चॅनेलवर शेअर करणार आहे. तुम्ही तो नक्की पहा, असे लुलियाने इंस्टा पोस्टवर लिहिले आहे.

सलमानची शेतातील पोस्ट व्हायरल 

काही दिवसांपूर्वी सलमान खान यानेही एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तो चिखलात माखलेला दिसत होता. तो आपल्या फार्महाऊसमध्ये शेती करत असल्याचे या फोटोतून दिसून येते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे की, सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करा.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक: पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -