घरमनोरंजनसलमान करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक!

सलमान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक!

Subscribe

लेखक - दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा आता हिंदीमध्ये बनवला जाईल. बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने हा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठीतील आणखी एक दर्जेदार चित्रपाटाचा रिमेक हिंदीमध्ये होणार आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या लेखक – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा आता हिंदीमध्ये बनवला जाईल. बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने हा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याला मुख्य भूमिकेत घेऊन हा चित्रपट बनवला जाणार आहे. पुढील वर्षात या हिंदी रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

वाचा : ‘मुळशी पॅटर्न’ची तीन दिवसांत खतररssss..नाक कमाई

- Advertisement -

वाचा : हतबल परिस्थितीतल्या गुन्हेगारीचा ‘मुळशी पॅटर्न’

वाचा : ‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर हल्ला

- Advertisement -

लवयात्रीपासून आयुषचे पदार्पण 

सलमान खानची बहिण अर्पिता हिचा पती आयुष शर्मा याने २०१८ साली बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केले. लवयात्री या चित्रपटातून आयुष पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसला असून हादेखील सलमान खान याच्याच निर्मितीतील चित्रपट होता. लवयात्री हा चित्रपट सपशेल पडला. मात्र सलमानचा मेहुणा असल्यामुळे आयुष आणखी काही चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यापैकीच एक मुळशी पॅटर्न ठरेल.

मुळशी पॅटर्नची अफाट कमाई 

दरम्यान, या वर्षीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी मुळशी पॅटर्न हा सिनेमा आहे. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ओम भुतकर याचेही कौतुक होत होते. आता आयुष शर्मा ही प्रमुख भूमिका कशी साकारतो हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

शिक्षणाच्या आयचा घोचाही रिमेक येतोय 

सलमान खानला मराठी चित्रपटाचा रिमेक बनवावासा वाटणं ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या शिक्षणाच्या आयचा घो सिनेमाचाही रिमेक हिंदीमध्ये करण्याचे सलमानने जाहीर केले होते. मात्र अजून हा चित्रपट झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -