घरमनोरंजनIIFA पुरस्कार मध्ये सलमानच्या बॉडीगार्डने दिला विक्की कौशलला धक्का; नेटकरी संतापले

IIFA पुरस्कार मध्ये सलमानच्या बॉडीगार्डने दिला विक्की कौशलला धक्का; नेटकरी संतापले

Subscribe

सर्वात लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असणारा ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स’ सोहळा आज अबू धाबीच्या यास बेटावर सुरु होणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. गुरुवारी या सोहळ्यासाठी एक खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यावेळी अभिनेता सलमान खान आणि विक्की कौशल देखील उपस्थि होते. यावेळीचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात विक्की आणि सलमान समोरासमोर दिसत आहेत. मात्र, सलमानच्या बॉडीगार्डने विक्कीला बाजूला केलं.

25 मे रोजी अबू धाबीच्या यास बेटावर ‘IIFA पुरस्कार 2023’ साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळचा विक्की कौशल आणि सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सलमानच्या बॉडीगार्डने विक्कीला बाजूला केलं आहे.

- Advertisement -

खरंतर, या व्हिडीओच्या सुरुवातील विक्की त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे. यावेळी सलमान आणि त्याचे बॉडीगार्ड समोरुन येत आहेत. विक्की वाटेत उभा असल्याने सलमानला जागा द्यावी म्हणून सलमानचा बॉडीगार्ड विक्की हाताने बाजूला करतो. यानंतर सलमान जवळ आलेला पाहून विक्की त्याला हॅलो म्हणतो. पण सलमान फक्त त्याच्याकडे पाहतो आणि पुढे जातो. सलमानचा हा अॅटीट्यूड पाहून सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. शिवाय विक्कीला बाजूला करणाऱ्या सलमानच्या बॉडीगार्डवर देखील ते संतापले आहेत.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “विक्की देखील सलमानसारखाच एक अभिनेता आहे तरी सलमान त्याला अॅटीट्यूड दाखवतो”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “सलमान किती असभ्य आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “तुम्ही हे अशा व्यक्तीशी करत आहात जो खरा हिरो आहे. विक्कीला इतका आदर आहे, त्याला काही फरक पडत नाही. हा खरा कलाकार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा :

कधीकाळी 50 रुपये रोजंदारीवर काम करत होते जेठालाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -