घरमनोरंजनसंजय जाधवसाठी हे कलाकार ठरणार 'लकी'!

संजय जाधवसाठी हे कलाकार ठरणार ‘लकी’!

Subscribe

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी कोण लकी ठरलंय? याची उत्सुकता प्रेक्षकांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना होती. त्यामुळे कोण स्टार कास्ट असेल? याची जोरदार चर्चा होती. आणि अचानक कलाकारांची फेसबुक पोस्ट प्रेक्षकांसमोर आली आणि ते लकी कलाकार प्रेक्षकांसमोर आले.

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव यांच्या ‘लकी’ सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेला एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. याचे मुख्य कारण आहे, या सिनेमाची स्टारकास्ट!

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट ७ डिसेंबर २०१८ रोजी झळकणार आहे. ‘लकी’ची घोषणा २ जुलैला करण्यात आली होती. पण या चित्रपटात कोण कोण स्टारकास्ट असेल, हे अद्याप गुलदस्त्यात होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी कोण लकी ठरलंय? याची उत्सुकता प्रेक्षकांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकरांनाही होती. त्यामुळे कोण स्टारकास्ट असेल? याची जोरदार चर्चा होती आणि अचानक कलाकारांच्या एका फेसबुक पोस्टमधून ते ‘लकी’ कलाकार प्रेक्षकांसमोर आले.

- Advertisement -

आधी उमेश कामत, मग सिद्धार्थ जाधव, त्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा ए-लिस्टर मराठी सेलेब्सनी तेच ‘लकी’ असल्याचं म्हटलंय. असा मल्टिस्टारर सिनेमा पाहणं, ही तर सिनेरसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे! रोज या सिनेमाविषयी फिल्म इंडस्ट्रीतले मोठमोठे सेलेब्स ते लकी असल्याचे सोशल मीडियाव्दारे सांगत आहेत.

 

- Advertisement -

Feeling ‘Lucky’ to be the part of लकी ❤ See you on 7th Sep 2018. #LuckyCastOnYourWay @dreamers_pr @luckymarathifilm Sanjay Jadhav @bliveproducions Deepak Rane #Lucky Releasing on 7th Dec 2018.

Posted by Amey Wagh on Sunday, 2 September 2018

 

 

#LuckyCastOnYourWay

Feeling 'Lucky' to be the part of लकी ❤️See you on 7th Sep 2018.#LuckyCastOnYourWay Lucky Film Sanjay Jadhav Dreamers PR & Marketing

Posted by Sai Tamhankar on Wednesday, 29 August 2018

या सगळ्या कलाकारांनी सोशल मीडियावरून आपण लकी ठरल्याचं सांगितलं आहे. आता यात अजून कोणते कलाकार असणार? याची उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -